Vasco: बेवारस वाहनांवर कारवाई सुरु; नियमांचे उल्लंघन मात्र थांबेना

मुरगाव नगरपालिका वाहन कारवाई व्यापक करा; नागरिकांनी केली मागणी
abandoned vehicles
abandoned vehiclesDainik Gomantak

वास्को: गेले काही दिवस वास्को शहर आणि परिसरातील बेवारस वाहनांवर कारवाई सुरु आहे. ही कारवाई व्यापक करत मुरगावातील सडा, जेटी, बोगदा व बायणा भागातील अनेक वर्षांपासून रस्त्यावर धूळ खात असलेल्या बेवारस भंगार वाहनावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

(vasco citizens demanded removed the abandoned vehicles )

मागणी करताना वास्को शहरातील भंगार वाहनांवर वास्को वाहतुक पोलिस व मुरगाव नगरपालिकेने कारवाई केली. त्याच मोहीमेअंतर्गत वास्को वाहतुक पोलिसांनी मुरगाव पोलिस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या सडा, जेटी, बोगदा व बायणा परिसरातील रस्त्यावरील भंगार वाहनावर कारवाई करावी असे म्हटले आहे.

abandoned vehicles
Traffic Jam in Panaji : Ironman 70.3 साठी वाहतुकीत बदल; शहरात 'ट्रॅफिक जॅम'

वास्को वाहतुक पोलिस, मुरगाव पोलिस स्थानक व मुरगाव नगरपालिकेने संयुक्तरित्या मुरगावातील सडा, जेटी, रुमाडावाडा, बोगदा, बायणा भागातील भंगार अवस्थेत असलेल्या बेवारस वाहनावर त्वरीत कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे.

abandoned vehicles
Goa Agriculture: शेतकऱ्यांना स्वयंभू बनविण्यासाठी युवकांनी पुढे यावे- रमेश तवडकर

मुरगावातील सडा, बोगदा, जेटी वरील मुख्य रस्ता तसेच राष्ट्रीय महामार्गावर वाहन पार्किंगमध्ये वाढ होत चालली आहे. तसेच वाहन चालक मिळेल त्याठिकाणी आपली वाहने पार्क करून वाहतुक नियमाचे उल्लंघन करीत आहे.

वास्को गांधीनगर बायणा येथून येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सडा येथून रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेकायदेशीरित्या वाहने उभी करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावर हातगाडे व इतर बेकायदेशीर व्यवसाय करण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाबरोबर पोलिसांनी निर्बंध आणावे, अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com