Land Grabbing Case Dainik Gomantak
गोवा

Land Grabbing Case: धारगळ जमीन हडप; माहिती सादर करा

एसआयटीला निर्देश ः आरोलकरांविरोधातील तक्रारदार रवळू खलप आयोगासमोर

गोमन्तक डिजिटल टीम

Land Grabbing Case: धारगळ येथील कथित जमीन हडपप्रकरणी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केलेले मूळ जमीन मालक रवळू खलप यांनी आज एकसदस्यीय आयोगासमोर हजर होऊन झालेल्या सुनावणीवेळी संबंधित जमिनीची सविस्तर माहिती दिली.

काही वेळ त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आयोगाचे अध्यक्ष व्ही. के. जाधव यांनी या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसआयटीला माहिती सादर करण्याचे निर्देश देऊन ही सुनावणी आता २३ मार्चला ठेवली आहे.

राज्यातील जमीन हडपप्रकरणीच्या तपासकामासाठी नियुक्त केलेल्या एसआयटीकडे धारगळ येथील जमीन हडपप्रकरणाची तक्रार मूळ मालक असलेले रवळू खलप यांच्यावतीने ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी दाखल केली होती.

या प्रकरणाची प्राथमिक चौकशी एसआयटीने सुरू केली. मात्र या चौकशीवेळी आमदार जीत आरोलकर यांना चौकशीसाठी एकदाही बोलवण्यात आले नाही.

त्यामुळे रॉड्रिग्ज यांनी नव्याने आयोगासमोर तक्रार दाखल केली आहे. त्यासाठी तक्रारदार रवळू खलप हे बाजू मांडण्यासाठी काल कॅलिफोर्निया येथून गोव्यात आले आहेत.

‘मगो’चे आमदार असताना जीत आरोलकर यांच्याविरुद्ध ॲड. रॉड्रिग्ज यांनी ही तक्रार खलप यांच्यावतीने क्राईम ब्रँचच्या विशेष तपास पथकाकडे सादर केली होती.

मगो पक्षाने सरकारला पाठिंबा दिला असल्याने आरोलकर हे सत्ताधारी पक्षात आहेत, तसेच ते गोवा गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्षही आहेत.

आरोलकर यांनी खलप यांची जमीन हडप केली आहे व त्याचे भूखंड करून त्याची विक्री केली आहे. त्यासाठी त्यांनी मूळ मालक रवळू खलप यांना कोणतीही कल्पना न देता ही जमीन हडप केल्याचा आरोप ॲड. रॉड्रिग्ज यांनी रवळू खलप यांच्यावतीने पॉवर ऑफ ॲटर्नी घेऊन केलेल्या तक्रारीत केला होता.

भूखंडासाठी जोडरस्तेही बनवले !

आज तक्रारदार रवळू खलप यांनी आयोगासमोर उपस्थिती लावून आमदार जीत आरोलकर यांनी त्यांच्या जमिनीलगतची जमीन खरेदी करण्याबरोबरच त्यांचीही जमीन कशी लाटली, याची सविस्तर माहिती दिली.

या भूखंडासाठी आरोलकर यांनी जोडरस्तेही तयार केल्याचा आरोप केला आहे. सुमारे 1.48 लाख चौ. मी. जमीन बळकावल्याचा असा दावा तक्रारदाराने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

महिलेच्या खासगी जागी बोट लावणे लैंगिक अत्याचार होत नाही; गोवास्थित मुंबई हायकोर्टाचा निर्णय, संशयिताला जामीन

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

SCROLL FOR NEXT