Deepali Parab Arrested In Mumbai Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud Case: 130 कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य संशियत दिपाली परबला अटक; मायरनच्या अटकेची प्रतिक्षा

Deepali Parab Arrested: दिपालीला आता पोलीस कोठडीसाठी बुधवारी (5 मार्च) मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Manish Jadhav

Share Market Fraud Myeron Rodrigues Wife Deepali Parab Arrested

शेअरबाजारात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या मायरॉन रॉड्रिग्ज याची पत्नी दिपाली परब (42, कल्याण - मुंबई) हिला गुन्हे शाखेने मंगळवारी (4 मार्च) अटक केली. दिपालीला आता पोलीस कोठडीसाठी बुधवारी (5 मार्च) मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मायरन-दिपाली जोडीने 38 गुंतवणूकदारांना फसवले

मिळालेल्या माहितीनुसार, फसवण्यात आलेल्या गुंतवणूकरदारांनी (Investors) दिलेल्या तक्रारीच्या आधारे गोवा पोेलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने संशयित मायरन आणि पत्नी दिपाली यांच्याविरोधात 2023 मध्ये दोन गुन्हे दाखल केले होते. या दोन्ही गुन्ह्यातून मायरन आणि दिपाली जोडीने 38 गुंतवणूकदारांना सुमारे 35 कोटींना फसवल्याचे समोर आले होते. ईओसीच्या चौकशीत मायरनच्या बॅंक खात्यामध्ये 2009 ते 17 ऑगस्ट 2023 यादरम्यान 130 कोटींचा आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून आले होते.

'या' कंपनीच्या बँक खात्यात 3.25 कोटी जमा केले

काही दिवसांपूर्वी, मायरने आयडिलिक गोवन गेटवेज कंपनीच्या बँक खात्यात 3.25 कोटी रुपये जमा केल्याचे समोर आले होते. त्यामुळे ईओसीने या कंपनीच्या संचालकांचीही सहसंशयित म्हणून दाखल केलेल्या गुन्ह्यात नोंद केली होती. त्यानंतर ईओसीने मायरन आणि त्याची पहिली पत्नी सुनिता आणि दुसरी पत्नी दिपाली यांच्या मिळून तीन बँक लॉकरमधून 3 कोटींचे 4.125 किलो दागिन्यांसह मालमत्तेचे कागदपत्रे जप्त केले.

सुनिताला अटक आणि सशर्त जामीन

याचदरम्यान ईओसीकडून गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. याचप्रकरणी गुन्हे शाखेने मायरन याची पहिली पत्नी सुनिता हिला अटक केली होती. मात्र त्यानंतर लगेच सुनिताला न्यायालयाने दिलासा देत सशर्त जामीन मंजूर केला होता.

दिपालीच्या पोलिस कोठडीची मागणी

मात्र आता मायरनची दुसरी पत्नी दिपाली परब हिला अटक करण्यात आल्याने या प्रकरणातील मोठा मासा म्हणजेच मायरन लवकरच गळाला लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता बुधवारी पोलिस दिपालीला मडगाव येथील प्रथम वर्ग न्यायालयात (Court) हजर करुन पोलिस कोठडीची मागणी करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT