Goa Temple Festival Dainik Gomantak
गोवा

Goa Temple Festival: शांतादुर्गा वेर्डेकरीण देवस्थानचा कालोत्सव, 28 पासून विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम

shantadurga verdkareen kalotsav: तलवाडा, वेरोडा-कुंकळ्‍ळी येथील शांतादुर्गा वेर्डेकरीण देवस्थानचा वार्षिक कालोत्सव /जत्रोत्सव शुक्रवार २८ ते ३० नोव्हेंबरपर्यंत साजरा करण्‍यात येणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: तलवाडा, वेरोडा-कुंकळ्‍ळी येथील शांतादुर्गा वेर्डेकरीण देवस्थानचा वार्षिक कालोत्सव /जत्रोत्सव शुक्रवार २८ ते ३० नोव्हेंबरपर्यंत साजरा करण्‍यात येणार आहे.

२८ रोजी सकाळी गणेश पूजन, महाअभिषेक, महानैवेद्य, मंगळारती, रात्री ९.३० वा. पालखी उत्सव, गणेश वंदना, श्रीमूर्तीची अष्टदिपालक उत्सव रथातून भव्य मिरवणूक, १०.३० वा. फ्रेंड रिक्वेस्ट हे कोकणी नाटक, गोपाळ काला आणि पालखीचे तळीकडे प्रस्थान होईल.

२९ रोजी आरती, रात्री ९.३० वा. विनोदी नाटक ‘लटर फटर घंच्येकटर’, रात्री ११.३० वा. श्रींची विजय रथातून भव्य मिरवणूक, ३० रोजी सकाळी अभिषेक, आरती, रात्री १० वा. देणगी कुपनाचा निकाल, १०.३० वा. ‘ऑर्केस्ट्रा ओम मेलोडीज’, रात्री जागर, पहाटे श्रींची ब्रम्हरथातून भव्य मिरवणूक, आरती व प्रसादाने उत्सवाची सांगता होईल.

दि. २८, २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी दुपारी व रात्री भाविकांनी श्रींच्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा. विशेष सूचना २९ नोव्हेंबर रोजी रात्री कार्यक्रमापूर्वी श्रीस अर्पण केलेल्या भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येईल असे देवस्‍थान कमिटीने कळविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: वास्कोत कचरा व्यवस्थापनाला बळ; दोन नवीन कॉम्पॅक्टरचे उद्घाटन, नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाचा इशारा

Rajasthan vs Goa womens T20: गोव्याच्या महिला संघाचा विजय, 23 वर्षांखालील टी-20 सामन्यात राजस्थानला नमविले

Inspiring Story: विश्‍वविजेतेपदाची 'गंगा' आली अंगणी... सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील गंगा कदमची प्रकाशझोतातील कामगिरी

क्रौर्याचा कळस! होमवर्क न केल्यानं 4 वर्षांच्या मुलाला कपडे काढून झाडावर लटकवलं, पाहा व्हिडिओ

Margao: मडगावात शनिवारी वीजपुरवठा खंडित! 'या' भागांमध्ये चालणार दुरुस्तीचं काम

SCROLL FOR NEXT