Margao  Dainik Gomantak
गोवा

Margao News : शांतादुर्गा फातर्पेकरीण जत्रोत्सव; गुरुवारपासून प्रारंभ

Margao News : चार दिवस कार्यक्रम; नाट्यरसिकांना मेजवानी

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News : मडगाव, फातर्पा येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण संस्थानचा प्रसिद्ध वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दि. ११ ते रविवार दि. १४ जानेवारी असे चार दिवस उत्साहात व धूमधडाक्यात साजरा केला जाणार आहे.

त्यानिमित्त संस्थानतर्फे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती अध्यक्ष दिवाकर बो. ना. देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी चिटणीस संतोष आ. ना. देसाई, खजिनदार आनंद पा. ना. देसाई व मुखत्यार मंगेश भी. ना. देसाई यांचीही उपस्‍थिती होती.

पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवार दि. ११ रोजी सकाळी श्रींस महाभिषेक, रात्री विधीपूर्वक नमन, १० वाजता शिबिकोत्सव, नंतर श्रींची चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक, दारूकामाची आतषबाजी, आरती, तीर्थप्रसाद व नंतर वळवई येथील कला चेतना प्रस्तुत ‘शुभ टिंगल सावधान’ हे कोकणी विनोदी नाटक सादर करण्‍यात येणार आहे.

दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार दि. १२ रोजी सकाळी विविध धार्मिक विधी, रात्री १० वाजता शिबिकोत्सव, श्रींची मयूर रथातून भव्य मिरवणूक व नंतर ‘छू-मंतर’ हा जादूचा कार्यक्रम होणार आहे.

 तिसऱ्या दिवशी शनिवार दि. १३ रोजी रात्री १० वाजता शिबिकोत्सवानंतर श्रींची सूर्य रथाथून भव्य मिरवणूक व नंतर कोकणी नाटक ‘शेजारी आमी शेजारी’ सादर करण्‍यात येणार आहे.

शेवटच्या दिवशी म्हणजे रविवार दि. १४ रोजी रात्री १० वाजता स्टार मेलोडीज ऑर्केस्ट्रा व सोमवार दि. १५ रोजी पहाटे ६ वाजता श्रींची महारथातून भव्य मिरवणूक झाल्यानंतर दारूकामाची आतषबाजी, आरती व तीर्थप्रसादाने जत्रोत्सवाची सांगता होणार आहे.भाविकांनी उपस्‍थिती लावावी, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

चारही दिवस असेल भाविकांसाठी महाप्रसाद

जत्रोत्‍सवाचे चारही दिवस दुपारी व रात्री महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलिस बंदोबस्त ठेवला जाईल. अग्निशामक दलाला चारही दिवस पाचारण करण्यात येणार असून वैद्यकीय सुविधाही उपलब्ध केल्या जातील.

श्रींस अर्पण केलेले सोन्या-चांदीचे दागिने, कपडे व इतर वस्तूंचा जाहीर लिलाव दि. १६ ते १९ जानेवारी असे चार दिवस सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत केला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

Konkan Migration: आफ्रिकेतून आलेले, होमो प्रजातींमधून विकसित झालेले काही मानव किनाऱ्यावर स्थायिक झाले; कोकणातली स्थलांतरे

Hybrid Car: कार घेण्याचा विचार करताय? 1200 किमी मायलेज असलेल्या 'या' 3 Hybrid Cars वर मिळतेय जबरदस्त सूट

SCROLL FOR NEXT