
भारतीय ऑटोमोबाईल बाजारात हायब्रिड कार्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. वाढत्या इंधन दरांमुळे आणि पर्यावरणाबाबत जनजागृतीमुळे ग्राहक आता पेट्रोल-डिझेल वाहनांच्या तुलनेत हायब्रिड कार्सकडे झुकू लागले आहेत. कमी इंधन वापर, दीर्घ रेंज आणि कमी कार्बन उत्सर्जनामुळे या कार्स अधिक लोकांपर्यंत पोहोचत आहेत. ऑटोमोबाईल कंपन्याही या ट्रेंडचा मागोवा घेत नव्या मॉडेल्स सादर करत आहेत आणि ग्राहकांना विविध सवलती देत आहेत.
भारतीय बाजारात सध्या हायब्रिड कार्सवर मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये मारुती ग्रँड विटारा ही सर्वाधिक चर्चेत असलेली SUV ठरते. जुलै २०२५ मध्ये या कारच्या स्ट्रॉंग हायब्रिड व्हर्जनवर तब्बल ₹१.८५ लाखांपर्यंत लाभ मिळू शकतो. या सवलतींमध्ये ₹७०,००० पर्यंत रोख सूट, ₹८०,००० पर्यंत एक्सचेंज बोनस आणि ₹३५,००० किमतीची विस्तारित वॉरंटीचा समावेश आहे.
माइल्ड हायब्रिड MY2024 मॉडेलवर ₹१.६५ लाखांपर्यंतची बचत करता येते, तर CNG व्हर्जनवर ₹२०,००० ची रोख सूट आणि ₹५०,००० पर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. याशिवाय, ग्राहकांना ₹५७,९०० किंमतीच्या डोमिनियन अॅक्सेसरीजही मोफत मिळतात.
टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर ही देखील स्ट्रॉंग आणि स्मार्ट हायब्रिड व्हर्जनमध्ये उपलब्ध असून, स्ट्रॉंग हायब्रिडवर ₹२५,००० रोख सूट, ₹४०,००० पर्यंत एक्सचेंज बोनस आणि टोयोटा वापरकर्त्यांना ₹५०,००० पर्यंत लॉयल्टी बोनस दिला जातो. स्मार्ट हायब्रिड प्रकारासाठी एकूण ₹७५,००० पर्यंतचा फायदा मिळतो.
Honda City eHEV ही एक प्रगत आणि इंधन-कार्यक्षम कार आहे. यावर कंपनी ₹९५,००० पर्यंत सूट देत आहे. पूर्वीची एक्स-शोरूम किंमत ₹२०.८५ लाख असलेली ही कार आता ₹१९.८९ लाखांमध्ये उपलब्ध आहे. यात १.५ लिटर पेट्रोल इंजिनसह दोन इलेक्ट्रिक मोटर्स दिल्या असून, एकत्रित १२६ बीएचपी पॉवर आणि २५३ एनएम टॉर्क निर्माण करते. eCVT गिअरबॉक्ससह येणाऱ्या या सेडानचे मायलेज २६.५ किमी/लिटर असून, ती सुमारे १००० किमी अंतराचा पल्ला सहज गाठू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.