constable Shankar Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Missing Case: 'मी घर सोडून जातोय', दुचाकीत चिठ्ठी ठेवून मडगावातील हवालदार बेपत्ता

Goa Police: दुचाकीत चिठ्ठी सापडली असून आपण घर सोडून जात असल्‍याचे त्‍यात लिहिल्याची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: मडगाव पोलिस स्‍थानकावर राईटर विभागात हवालदार म्‍हणून काम करणारे शंकर नारायण सावंत हे सोमवार, २९ जुलैपासून बेपत्ता असून मडगाव पोलिस स्‍थानकावरील आपली ड्युटी संपवून ते डिचाेली येथे आपल्‍या घरी जात असताना ही घटना घडली आहे. यासंदर्भात सावंत यांच्‍या पत्‍नीने डिचाेली पाेलिस स्‍थानकावर पती बेपत्ता असल्‍याची तक्रार नोंदवली आहे. एक पोलिसच बेपत्ता झाल्‍याने या प्रकरणातील गूढ वाढले आहे.

सावंत हे सर्वण-डिचोली येथे राहणारे असून आपली पाेलिस स्‍थानकावरील ड्युटी संपवून ते आपल्‍या घरी जात हाेते. डिचाेली पोलिस स्‍थानकाचे निरीक्षक दिनेश गडेकर यांच्‍याशी संपर्क साधला असता, सावंत यांना काल सोमवारी दुपारी ३ ते ४ वा. यादरम्‍यान सर्वण-डिचोली परिसरात लोकांनी शेवटचे पाहिले होते. त्‍यांच्‍या दुचाकीत एक चिठ्ठी सापडली असून आपण घर सोडून जात असल्‍याचे त्‍यात त्‍यांनी लिहिल्याची माहिती दिली.

बदलीसाठी सुरू होते प्रयत्न

सावंत यांची एका वर्षापूर्वी मडगाव पोलिस स्‍थानकात बदली केली हाेती. दरराेज डिचाेलीतून ते मडगावात जात असत. मडगाव कार्यालयात आपल्‍यावर कामाचा ताण येतो, असे त्‍यांनी यापूर्वी आपल्‍या मित्रांना सांगितले होते. त्‍यामुळे आपली मडगावहून बदली व्‍हावी यासाठी त्‍यांचे प्रयत्‍न सुरू हाेते. याच तणावातून त्‍यांनी घर साेडून जाण्‍याचा निर्णय घेतला असावा, अशी शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे. सध्‍या डिचाेली पाेलिस त्‍याचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT