Shankar Mahadevan live Dainik Gomantak
गोवा

Shankar Mahadevan: सुरेल स्वरांची 'श्री' सेवा! संगीत सम्राट शंकर महादेवन पर्तगाळ मठात, सादर करणार भजन संध्या

Shankar Mahadevan Partagal Math: सार्थ पंचशताब्दी सोहळ्याची सांगता एका मधुर आणि भक्तीमय कार्यक्रमाने होणार आहे

Akshata Chhatre

Shankar Mahadevan bhajan sandhya: गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाच्या स्थापनेला ५५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'सार्थ पंचशताब्दी सोहळ्याला' एका ऐतिहासिक वळणावर पूर्णविराम मिळाला आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती आणि त्यांच्या हस्ते झालेले विविध अनावरण समारंभ, यानिमित्ताने आज रविवार (दि.३०) रोजी प्रख्यात गायक शंकर महादेवन यांच्या 'भजन संध्येचे' आयोजन करण्यात आले आहे.

आज होणार 'भजन संध्या'

सार्थ पंचशताब्दी सोहळ्याची सांगता एका मधुर आणि भक्तीमय कार्यक्रमाने होणार आहे. आज, ३० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ९ वाजल्यापासून जीवोत्तम मठात प्रख्यात संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांच्या 'भजन संध्येचे' आयोजन करण्यात आले आहे.

ते आपल्या मधुर आवाजात, भक्तीमय भजनांमधून 'श्रीं'चे दिव्य माहात्म्य प्रभावीपणे सादर करणार आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे आधीच उत्साहाचे वातावरण असलेल्या मठात, आता शंकर महादेवन यांच्या संगीत सोहळ्यामुळे भक्तीचा संगम अनुभवायला मिळेल.

आशियातील सर्वात उंच श्रीराम मूर्तीचे अनावरण

शुक्रवार (२८) रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मठ संकुल परिसरात उभारलेल्या ७७ फूट उंच श्रीरामांच्या भव्य मूर्तीचे अनावरण करण्यात आले. ही मूर्ती केवळ गोव्यासाठी नव्हे, तर आशियातील सर्वात उंच श्रीराम मूर्ती म्हणून नावारूपास येत आहे. या सोहळ्यामुळे पर्तगाळ मठ संकुलाला आता 'दक्षिण अयोध्या' म्हणून ओळखले जाण्याची शक्यता आहे.

मोदींनी यावेळी केलेल्या भाषणात, त्यांना दोन दिवसांत मिळालेल्या 'दैवी योगां'बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले अयोध्येतील श्रीराम मंदिरावर भगवा धर्मध्वज फडकवण्याचा मला मान मिळाला आणि इथे पर्तगाळ येथे आशियातील सर्वात उंच श्रीराम मूर्तीचे अनावरण करण्याचा योग आला. हे दोन्ही योग माझ्यासाठी 'अभूतपूर्व' असून मी धन्य झालो आहे," असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

विशेष नाणे आणि टपाल तिकिटाचे अनावरण

या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधान मोदींच्या हस्ते विशेष टपाल तिकिटाचे तसेच ५५० रुपयांच्या विशेष नाण्याचेही अनावरण करण्यात आले. या अनावरणामुळे मठाच्या ५५० वर्षांच्या स्थापनेच्या या सोहळ्याची आठवण कायमस्वरूपी जपली जाणार आहे. या विशेष नाण्यांमुळे आणि टपाल तिकिटांमुळे या सोहळ्याला राष्ट्रीय स्तरावरचे महत्त्व प्राप्त झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Casaulim: ..आणखीन एक खळबळजनक घटना! शेतात आढळली मानवी कवटी; कासावली परिसरात भीतीचे वातावरण

Goa Drowning Death: 96 जण समुद्रात बुडाले, 2654 जणांना जीवनदान; गोव्यात 5 वर्षात झालेल्या दुर्घटनांचा Report

Goa Latest Updates: गोवा प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षपदी अर्चित नाईक

VIDEO: साळगावमध्ये 'रेंट-ए-बाईक' वादातून राडा, टोळक्याकडून पिता-पुत्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण; जीवे मारण्याची दिली धमकी

Cyber Crime Goa: काळजी घ्या! गोव्यात सायबर भामट्यांकडून सुमारे 74 कोटींचा चुना! ज्‍येष्‍ठ नागरिक होताहेत टार्गेट

SCROLL FOR NEXT