Goa Beach Shack Dainik Gomantak
गोवा

Goa Beach Shack: सासष्टीमधील शॅक मालकांना सतावतोय सांडपाण्याचा प्रश्न; आमदार व्हेन्झी व्हिएगस यांच्याशी केली चर्चा

Kavya Powar

Goa Beach Shack: येत्या पर्यटन हंगामाला लवकरच सुरुवात होत आहे. मात्र शॅक मालकांपुढे नव्याने प्रश्न उभा राहीला आहे. राज्याच्या किनारपट्टीवरील असलेल्या सासष्टीमध्ये असलेल्या बीच शॅक्समध्ये निर्माण होणारे सांडपाणी कसे आणि कोण हाताळणार? हा प्रश्न गोवा सरकारने नव्या बीच शॅक धोरणाचे अनावरण केल्याने ऐरणीवर आला आहे.

गोवा शॅक ओनर्स सोसायटीचे अध्यक्ष क्रुझ कार्डोझो म्हणाले की, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (GSPCB) समुद्रकिनारी शॅकच्या मालकांना सांडपाणी विल्हेवाट लावण्यासाठी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिले होते, परंतु ते व्यर्थ ठरले.

क्रूझ यांनी निदर्शनास आणून दिले की, बीच शॅकचे मालक सांडपाण्याचा प्रश्न हाताळण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामध्ये (एसटीपी) गुंतवणूक करण्यास तयार आहेत परंतु ही वस्तुस्थिती आहे की मालकाला किती वर्षे बीच शॅक चालवण्याची परवानगी मिळेल याची शाश्वती नाही.

आम्ही सांडपाण्याचा प्रश्न हाताळण्यासाठी सरकारला सहकार्य करण्यास तयार आहोत. मात्र, पारदर्शक पद्धतीने काम करण्यात सरकार गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. आजपर्यंत, आम्हाला नवीन बीच शॅक पॉलिसी देखील दाखविण्यात आलेली नाही, शॅक मालकांनी व्यक्त केले.

समस्या सोडवण्यासाठी, शॅक मालकांनी बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना मदत करण्यासाठी आणि सांडपाणी समस्येचे निराकरण कसे करावे यासाठी मदत मागितली आहे.

याबाबत व्हेन्झी व्हिएगस यांनी एक योजना तयार करण्याचे आश्वासन दिले आहे. तोडगा काढण्यासाठी त्यांनी शॅक मालकांची बैठक बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT