Margao SGPDA Fraud Dainik Gomantak
गोवा

Margao: 'SGPDA'च्या सोपो वसुलीत मोठा भ्रष्‍टाचार! महसूल 10 लाख, दाखवतात दीड लाख; फर्नांडिस यांचा आरोप

Margao SGPDA Scam: एसजीपीडीएकडून मडगावातील होलसेल मासळी मार्केटात व्‍यवसाय करणाऱ्या व्‍यावसायिकांकडून जी सोपो वसुली केली जाते त्‍यात लाखो रुपयांचा घोटाळा होत आहे.

Sameer Panditrao

मडगाव: एसजीपीडीएकडून मडगावातील होलसेल मासळी मार्केटात व्‍यवसाय करणाऱ्या व्‍यावसायिकांकडून जी सोपो वसुली केली जाते त्‍यात लाखो रुपयांचा घोटाळा होत आहे. या सोपोतून दरमहा १२ लाख रुपयांची वसुली होत असल्‍याचे दाखविण्‍यात आले असले तरी सरकारी तिजोरीत उत्‍पन्न म्‍हणून फक्‍त दीड लाखच जमा केले जातात असा आरोप यापूर्वी सोपो वसुली करणारे कंत्राटदार मिलाग्रीस फर्नांडिस यांनी केला.

फर्नांडिस यांनी येथे घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत आरटीआय अर्जातून मिळालेल्‍या माहितीचा हवाला देत सांगितले की, मागच्‍या तीन महिन्‍यात एसजीपीडीएला सोपो वसुलीतून दरमहा दहा ते बारा लाखांचा महसूल प्राप्‍त झाला आहे.

मात्र यापैकी दीड ते पावणेदोन लाख रुपयेच सरकारी तिजोरीत जमा केले जातात. बाकीची रक्‍कम वसुली करणाऱ्या कामगारांचे वेतन आणि इतर देखभालीसाठी खर्च केला जात असल्‍याची माहिती आरटीआय अर्जातून आपल्‍याला मिळाल्याचा दावा त्‍यांनी सांगितले. आपण ७ वर्षांपूर्वी ही वसुली करत होतो, त्‍यावेळी सर्व खर्च स्‍वत: करून एसजीपीडीएच्‍या तिजोरीत साडेबारा लाख रुपये जमा करायचो.

यावेळी एजंटांना ५०० रुपये तर मच्‍छीमारांसाठी फक्‍त १०० रुपये घेतले जायचे. आता एजंट व मच्‍छीमार या दोघांकडूनही ५०० रुपयेच वसुल केले जातात. त्‍यामुळे एसजीपीडीएचा सोपो महसूल वाढण्‍याची गरज होती. प्रत्‍यक्षात हा महसूल कमी झाल्‍याचे दाखविले जाते आणि उलट खर्च वाढल्‍याचे सांगितले जाते असा आरोप त्‍यांनी केला.

उच्‍च न्‍यायालयात दाद मागणार

या वसुलीत मोठ्या प्रमाणावर निधीचा अपहार होत आहे. यामुळेच एसजीपीडीए या वसुलीसाठी निविदा जारी न करता स्‍वत: वसुली करते. हे लाखो रुपये कुणाच्‍या घशात जातात असा प्रश्‍न उपस्थित करून हे प्रकरण आपण उच्‍च न्‍यायालयापर्यंत नेऊन एसजीपीडीएतल्‍या भ्रष्‍टाचाराचा पर्दाफाश करू, असे त्‍यांनी सांगितले. एसजीपीडीएने फक्‍त पाच महिन्‍यासाठीच ही वसुली आपल्‍याकडे सोपवावी आपण एसजीपीडीएच्‍या तिजोरीत दरमहा २० लाख रुपये जमा करू, असेही त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

SCROLL FOR NEXT