Margao Court: मतिमंद युवतीवर गेस्ट हाऊसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार; शाहजाद शेखचा जामीन फेटाळला

Goa Crime News: मतिमंद युवतीचे फातोर्डा येथून अपहरण करुन कासावली येथील फ्लॅटवर तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला होता.
Court Order | Goa Crime News
Margao Court OrderDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: कासावली येथील एका मतिमंद युवतीवर एका गेस्ट हाऊसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला शाहजाद मोहम्मद शेख (खारीवाडा-वास्को) याचा जामीनअर्ज मडगाव सत्र न्यायालयाने फेटाळला.

ही घटना २२ जानेवारी रोजी रात्री घडली होती. त्यानंतर शाहजाद याला फातोर्डा पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यासमवेत आणखी चार संशयित आहेत. पैकी शाहजादने आपल्याला जामिनावर सोडण्यात यावे म्हणून न्यायालयात अर्ज केला होता.

यावर सरकार पक्षाने न्यायालयात आपली बाजू मांडताना संशयितावर असलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असून दोषी आढळून आल्यास त्याला २० वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे.

Court Order | Goa Crime News
Goa Tourism: महिला, लहान मुलांच्या सुरक्षेत हयगय कराल तर खबरदार...; सरकारची हॉटेल्सना सक्त सूचना

अटक करतेवेळी का अटक करण्यात येत आहे, याची कारणे संशयिताकडे स्पष्ट करण्यात आली होती. तसेच संशयिताची सही त्यावर घेतली होती आणि म्हणून त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात यावा अशी विनंती केली होती. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आपले निरीक्षण नोंद केले.

काय आहे प्रकरण?

मतिमंद युवतीचे फातोर्डा येथून अपहरण करुन कासावली येथील फ्लॅटवर तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. २२ जानेवारी २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती.

याप्रकरणी आदिल अलगर (१८), मोहम्मद अली मुल्ला (२२), शाहजाद शेख (१८), विरेश आग्वांदा (१८) व मोहम्मद शेख (१८) यांना अटक करण्यात आली होती.

पाचही संशयित परप्रांतीय असून, कामानिमित्त गोव्यात आले होते. पोलिसांनी गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याच रात्री चार जणांना ताब्यात घेतले व चौकशीअंती अटक केली. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Margao Municipal Council Garbage Tender Scam
Goa Crime
 Margao Jewelers Murder Case
Bombay High Court Goa Bench Judgment
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com