पणजी: लैंगिकता या विषयावर अजूनही समाजात खुलेपणाने बोलणे टाळले जाते,अजूनही वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही हा विषय शिकवला जात नाही, त्यामुळे यासंबंधी बहुतांश डॉक्टरही लैंगिक समस्यांवरील उपचारांबाबत दिशा ठरवण्यात परिपूर्ण किंवा तयार नसतात, अशी खंत प्रसिध्द सेक्सोलॉजिस्ट डॉ.प्रकाश कोठारी यांनी व्यक्त केली.
कौन्सिल आॅफ सेक्स एज्युकेशन ॲंड पॅरेंटहूड इंटरनॅशनल (सीएसईपीआय) तर्फे लैंगिकता या विषयावर 26 व 27 मार्च रोजी पहिली राष्ट्रीय परिसंवाद बोगमालो बीच रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आली होती. या परिसंवादापूर्वी पुरूषांमधील लैंगिक समस्यांचे व्यवस्थापन या विषयावर परिसंवादपूर्व कार्यशाळा डॉ. कोठारी यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
लैंगिक शिक्षण ही काळाची गरज असून आजच्या काळात महत्त्वाचे बनले आहे. सध्याच्या युगात इंटरनेट मुक्तपणे उपलब्ध होणारा स्त्रोत आहे,पण त्यातून अवाजवी आणि अनावश्यक माहितीही लोकांपर्यंत पोहचते,त्यातून गैरसमजही पसरतात,असेही डॉ.कोठारी म्हणाले.
लैंगिक समस्येशी संबंधित रूग्णांशी त्या विषयावर कसे बोलते करावे,किंवा उपचाराची दिशा कशी ठरवावी,याचेही मार्गदर्शन डॉ.कोठारी यांनी केले.
आयोजन समितीचे अध्यक्ष शिरीष मालदे यांनी सांगितले,की सदर परिसंवाद आयोजनामागे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या आरोग्य सेवकांमध्ये वैद्यकीय कौशल्यांत वृध्दी व्हावी,तसेच लैंगिक समस्यांच्या व्यवस्थापनाबद्दल वैज्ञानिक ज्ञानात भर पडावी,हे उद्दिष्ट होते. देशभरातील सुमारे 200 डॉक्टर्स या परिसंवादासाठी उपस्थित होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.