Sexual Assault Case Gomantak Digital Team
गोवा

Sexual Assault Case : लैंगिक अत्याचार प्रकरणातील अक्षयानीचा जामीन फेटाळला

पणजी पोलिसांचा तपास सुरू असताना संशयिताने जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्‍याप्रकरणी संशयित अक्षयानी पुरेशेठी रंगय्या याने जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतला. संशयिताने अर्ज मागे घेतल्याने तो फेटाळण्यात येत असल्याचे जिल्हा व सत्र न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. पणजी पोलिसांनी त्‍याच्‍याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

पणजी पोलिसांनी संशयिताला 4 मार्च 2023 रोजी अटक केली होती. त्याच्याविरोधात भादंसंच्या कलम 363 व 377 तसेच बालकायदा कलम 8 तर पोक्सो कायद्याखाली 4,8,12 व 21 कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. पणजी पोलिसांचा तपास सुरू असताना संशयिताने जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता.

‘त्याच्याविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असून त्याला या गुन्ह्यात अडकवण्यात आलेले आहे. तो निष्पाप असून त्याने गुन्हा केलेला नाही. गेली अनेक वर्षे तो गोव्यात वास्तव्यास असून त्याचा गोव्यात मूळ पत्ता आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी कोणताच गुन्हा नोंद झालेला नाही. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असल्याने पोलिसांना तो चौकशीसाठी नको आहे. जामिनावर सुटल्यावरही संशयित पोलिसांना तपासकामात सहकार्य करण्यास तयार आहे. न्यायालय ज्या अटी घालील त्याची पूर्तता करण्याची तयारी आहे’’ असे संशयिताने अर्जात नमूद केले होते.

न्यायालयाने पणजी पोलिसांना यासंदर्भात नोटीस पाठवून त्यावरील सुनावणी पुढे ढकलली होती. पोलिसांनी त्याच्या अर्जाला विरोध केला होता. दरम्यान, संशयित कोठडीत असल्याने पोलिसांनी तीन महिने पूर्ण होण्यापूर्वीच न्यायालयात त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. त्यामुळे संशयिताने जामिनासाठीचा अर्ज मागे घेत असल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने तो मागे घेण्यास संमती देताना तो फेटाळत असल्याचे आदेशत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT