Bardez  Dainik Gomantak
गोवा

Bardez News : गटार व्यवस्थेचे तीन तेरा; म्हापसा बाजारात संताप

Bardez News : पालिकेने डागडुजी आणि गटांरावर लाद्या तसेच गटारांची साफसफाई न केल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे येथील व्यापाऱ्याचे म्हणने आहे. त्यांनी तसा संतापही व्यक्त केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Bardez News :

बार्देश, अजूनही राज्यात पावसाने पाहिजे तसा जोर धरला नाही मात्र दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे म्हापसा बाजारपेठेतील गटारव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत.

पालिकेने डागडुजी आणि गटांरावर लाद्या तसेच गटारांची साफसफाई न केल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे येथील व्यापाऱ्याचे म्हणने आहे. त्यांनी तसा संतापही व्यक्त केला.

यासंदर्भात, म्हापसा व्यापारी संघटनेचे कार्यकारी सदस्य तथा प्रसिद्ध कपड्याचे व्यापारी गितेश डांगी म्हणाले की, दरवर्षी गटारांची साफसफाई करून दिली जाईल, असे पालिकतर्फे सांगितल्या जाते. मात्र तसे होत नाही. दरवर्षी पावसाच्या दिवसात गटारातून घाण पाणी वाहून दुकानात शिरते. अशा अवस्थेतच आम्हा व्यापाऱ्यांना व्यवसाय करावा लागतो.

कामे अजूनही सुरूच : डॉ. नूतन बिचोलकर

म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या, म्हापसा पालिका बाजारातील गटारांची साफसफाई व डागडुजी करण्यात येत आहे. काही शिल्लक असलेल्या गटारांची साफसफाई करण्याचे काम चालू ठेवण्यात यावे, असेही सांगितले आहे. पण म्हापसा मटक्याच्या बाजारातील सोनारांच्या रागातील गटारे गेल्या काही वर्षांपासून ‘जैसे थे’ च्या स्थितीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "भारताला चार गुजराती चालवतायेत, त्यापैकी दोन देश विकतायेत...'' हाय-होल्टेज सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त वक्तव्य

एक्झिट परमिट संपलं तरी भारतातच मुक्काम! 3 परदेशी नागरिकांवर कारवाई; म्हापसा डिटेंशन सेंटरमध्ये केली रवानगी

Budhaditya Rajyog 2026: कष्टाचं होणार सोनं...! बुधादित्य राजयोग 'या' राशींना करणार मालामाल; भाग्याचीही मिळणार साथ

IND vs PAK: पाकिस्तानच्या आडमुठ्या धोरणानं क्रिकेट फॅन्स 'क्लीन बोल्ड'; हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी कोलंबोतील हॉटेल अन् तिकिटांचे दर गगनाला भिडले

Goa Politics: खरी कुजबुज; सावर्डे मतदारसंघात दोन भाजप गट?

SCROLL FOR NEXT