Calangute Panchayat Dainik Gomantak
गोवा

Calangute News: कळंगुटमध्ये ‘मलनिस्सारण’चे काम रोखले

प्रमाणपत्रांशिवाय सुरू होते काम : वीज खंडित करण्यासाठी खात्याला लिहिणार पत्र

गोमन्तक डिजिटल टीम

Calangute Panchayat कळंगुट पंचायत मंडळाने बुधवारी (ता.26) येथील मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पाची (एसटीपी) पाहणी केली. यावेळी हा प्रकल्प संमतीशिवाय तसेच भोगवटा प्रमाणपत्राशिवाय सुरू केला असल्याचे आढळल्याने हे काम बंद करण्याचे निर्देश पंचायतीने दिले.

तसेच या प्रकल्पाची वीज जोडणी तोडावी, यासाठी पंचायत वीज विभागाला पत्रही लिहिणार आहे. बुधवारी, कळंगुट पंचायतीने स्थानिक लोकांसह मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी केली असता आढळले की, प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात आहे.

त्यामुळे शेतजमीन आणि एकूणच पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. यावेळी प्रक्रिया न करताच सांडपाणी नाल्यात सोडल्याचा मुद्दा स्थानिक रहिवाशांनी पंचायत सदस्यांमार्फत उपस्थित केला.

कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा या विषयावर म्हणाले की, मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प संमतीशिवाय तसेच भोगवटा प्रमाणपत्राशिवाय सुरू केलेला आम्हाला दिसून आला. आम्ही मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी केली.

तेव्हा आढळले की, प्रकल्प परवानगीशिवाय कार्यान्वित आहे. तसेच प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात होते. याविषयीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता.

त्यानुसार आम्ही संबंधितांना प्रकल्पाचे काम थांबवायला सांगितले आणि भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्यास कळविले आहे, असे सिक्वेरा म्हणाले.

‘एसटीपी’ हा सर्वांत मोठा घोटाळा

सरपंच जोसेफ सिक्वेरा म्हणाले की, कळंगुट पंचायतीने गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची या विषयावर भेट घेतली होती. आम्हाला एका अभियंत्याने कळवले की, पंचायतीने 2011 साली प्रकल्पाच्या कामासाठी तीन वर्षांसाठी 2013 पर्यंत संमती दिली होती.

परंतु अजून या प्रकल्पाचे काम झालेले नाही. एसटीपी हा सर्वांत मोठा घोटाळा असून आम्ही संबंधित अभियंत्यांविरोधात पोलिसांत तक्रार करणार आहोत, असे सिक्वेरा यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: सभापती गणेश गावकरांनी दिल्लीत घेतली नितीन गडकरींची भेट

Chain Snatching: चोरट्यांचा धुमाकूळ! वृद्ध महिलेची 2 लाखांची चेन हिसकावली; नावेलीतील तिसरी घटना, परप्रांतीय टोळी असल्याचा संशय

Police Misconduct Case: पोलिस उपनिरीक्षकाला ढकलले, जीपवर मारले हातोडे; धमक्या दिल्या; 5 जणांविरोधात खटला चालवण्याचा आदेश

Edberg Pereira Case: 'नीलेश शिरवईकरला बडतर्फ करा'! नावेलीवासीयांची मागणी; एडबर्ग मारहाणीच्या निषेधार्थ मेणबत्ती मोर्चा

Goa Politics: खरी कुजबुज; पेडणे तालुका नेहमीच चर्चेत

SCROLL FOR NEXT