Goa water problem Dainik Gomantak
गोवा

देरोडेत रस्ता झाला; गटारांकडे केले दुर्लक्ष

पावसाचे पाणी घरांत : ढिसाळ नियोजनाचा फटका

दैनिक गोमन्तक

वाळपई : ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना अनेक वर्षांपासून सरकार राबवत आहे. पण, नगरगाव पंचायत क्षेत्रातील देरोडे गावात लोकांना मात्र वेगळाच अनुभव येत आहे. कारण रस्ता बांधणीतून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही सरकारने योजना खरोखरच राबवली आहे काय?, असा संतप्त सवाल दरोडेतील लोकांनी केला आहे.

रस्ता करण्याआधी दोन्ही बाजूंनी गटार बांधण्यात आलेले नाही. त्यामुळे पावसाचे पाणी लोकांच्या घरात घुसले आहे. देरोडे गावात काही महिन्यांपूर्वी रस्त्यांचे जाळे विणले होते. परंतु हे करीत असताना रस्ता करण्यापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गटारे बांधली नाहीत. सध्या मुसळधार पावसामुळे रस्त्यालगच्या भागात पाणी मोठ्या प्रमाणावर तुंबून राहते. यावरून देरोडे गावच्या लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

संरक्षक भिंत काय कामाची?

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही नाविन्यपूर्ण योजना खरोखरच राबवली आहे का? हे सरकारने तपासून पहावे, असे सामाजिक माध्यमांद्वारे विचारले जात आहे. सद्यःस्थितीत पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा येत आहे. पाणी रस्त्यावरुन लोकांच्या घरात शिरते आहे.

त्यातून घरातील लोकांना त्रासदायक ठरते आहे. त्यामुळे लोक त्रस्त बनले आहेत. रस्त्याकडेला एके ठिकाणी संरक्षक भिंत बांधली असली तरी त्याला तडा गेले आहेत. शिवाय नको त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधल्याचा दावाही लोकांनी केला आहे.

होईल अनाठायी खर्च

पावसाळ्यात गटाराचे काम होणार नसल्याने देरोडेच्या लोकांना यंदाच्या पावसात अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पावसातच गटार बांधायचे म्हटल्यावर रस्त्यालगत पुन्हा खणणे सुरू होणार आणि पुन्हा अनाठायी खर्च होणार आहे.

गटाराचे बांधकाम करतेवेळी रस्त्याला धोका पोहचण्याची शक्यता आहे. रस्त्याचेही काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT