Sewage problem in Margao  Dainik Gomantak 
गोवा

Margao: मडगावातील सांडपाणी समस्या ‘जैसे थे’!

दुर्गंधी कायम : उच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपूनही तोडगा नाही

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव : व्यापारी राजधानी मडगावातील गटारांतून नाल्यात व शेती तसेच खुल्या जागेत वाहणा-या सांडपाणी व मलमुत्र समस्येवर तोडगा शोधण्यासाठी उच्च न्यायालयाने मडगाव नगलपालिका व संबंधित सरकारी यंत्रणांना दिलेली चार आठवड्यांची मुदत संपली पण अजूनही समस्या ‘जैसे थे’ असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शहराच्या अनेक भागात व प्रामुख्याने कोंब परिसरात मलनिस्सारणाच्या फुटलेल्या चेंबरमधून दूषित तसेच पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर उसळी घेत होते, अशा समस्या अजून तशाच आहेत.

विशेषतः यंदांच्या मुसळधार पावसामुळे ही समस्या अधिक तीव्रतेने दिसून आली. मलनिस्सारण जोडणी न घेतलेल्या व ज्यांच्या सेप्टिक टाक्या भरून वाहतात, अशा सुमारे शंभरावर निवासी व व्यापारी संकुलांना नगरपालिकेने नोटिसा बजावल्या असून प्रत्येकी पाच हजार रु. दंडही ठोठावला आहे. त्यातील अनेकांनी पालिका मुख्याधिकारी रोहित कदम यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली आहे.

दरम्यान मलनिस्सारणाच्या चेंबरातील अडथळे दूर करण्यासाठी स्वयंचलित रोबोट मडगावात आणला गेला आहे. तेल व वायुआयोगाने तो खात्याला दिला आहे.

रहिवाशांच्या म्हणण्याप्रमाणे ते जोडणी घेण्यास तयार आहेत, पण त्यांच्या घरालगत वाहिनी गेलेली नाही. त्यांची काहीच चूक नसताना हा दंड का असा सवाल ते करत आहेत. अन्य काहींच्या म्हणण्याप्रमाणे पावसाळ्यात जोडण्या देण्याचे काम बंद आहे. ते नोव्हेंबर मध्ये सुरू होईल, तोपर्यत प्रतीक्षा करण्याखेरीज पर्याय नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT