Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Water Dispute : साळ गावावर तीव्र पाणीटंचाईचे संकट

मेणकुरे टाकीतून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाल्यामुळे अर्धा गाव पाणीटंचाई ग्रस्त होता

गोमन्तक डिजिटल टीम

साळ मध्ये शनिवारी व रविवार दि.6 मार्च रोजी पाण्याची टंचाई समोर आली. गडेत्सवाच्या तयारीत असलेल्या साळवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.

साळ गावातील गृहिणी उत्सवासाठी घरात साफसफाई करत आहेत. पण पाणीच न मिळाल्याने कामे अडून राहिली. ऐन उत्सवावेळी पाणीटंचाई ओढवली आहे. श्री भूमिका मंदिराच्या सभा मंडपात आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांच्या अध्यक्षतेखाली सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत साळ ग्रामस्थांनी पाणी प्रश्न उपस्थित केला होता.

अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत आमदार शेटये यांनी पाणीटंचाई होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांना सूचित केले होते. पण तरीही पाणीप्रश्‍न न सुटल्याने ग्रामस्थांत नाराजी आहे.

साळमध्ये पडोसे व अडवल अस्नोडा पाणी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. आज मेणकुरे टाकीतून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाल्यामुळे अर्धा गाव पाणीटंचाई ग्रस्त होता,त्यातच पडोसे मार्गे येणारी जलवाहिनी मध्येच फुटल्याने तोही पाणी पुरवठा बंद झाला आहे.

त्यामुळे संपूर्ण गावच आता पाण्यापासून वंचित झाला आहे. पाणीप्रश्‍नी लक्ष घालून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये व जिल्हा पंचायत सदस्य संजय शेटये यांनी सोडवावा, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT