Goa Panchayat Workers Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Workers: सातवा वेतन आयोग लागू करा, अन्यथा पंचायत कर्मचारी संपावर; 'आयटक'चा इशारा

Goa 7th Pay commission : पंचायत कर्मचाऱ्यांना सातत्त्याने सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत देत आहेत परंतु प्रत्यक्षात अमंलबजावणी केली जात नाही.

Sameer Amunekar

पणजी: पंचायत कर्मचाऱ्यांना सातत्त्याने सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत देत आहेत परंतु प्रत्यक्षात अमंलबजावणी केली जात नाही. आम्ही पंचायत कामगारांचा आवाज दाबू देणार नसून जर लवकरात लवकर पंचायत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला नाही तर सर्व पंचायत कर्मचारी संपावर जातील, असे ‘आयटक’चे ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी सांगितले.

आझाद मैदान येथे आपल्या विविध मागण्या सरकारने मान्य कराव्यात, यासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या पंचायत कर्मचाऱ्यांना ते संबोधित करत होते. यावेळी कॉम्रेड राजू मंगेशकर व इतर उपस्थित होते.

दरम्यान फोन्सेका म्हणाले, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी विधानसभेत लवकरच पंचायत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करू,असे आश्वासन दिले. परंतु सरकार केवळ पंचायत कर्मचाऱ्यांना ‘भिवपाची गरज ना’ म्हणत आहे.

आमदारांनी जाहीर पाठिंबा दर्शवावा!

पंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांना सरकार तसेच विरोधी पक्षातील सर्व आमदारांचा पाठिंबा आहे परंतु आता हा पाठिंबा सार्वजनिकरित्या त्यांनी दाखविणे गरजेचे आहे. सरकारला देखील आमच्या मागण्या ग्राह्य असल्याची कल्पना आहे, तरीही सातवा वेतन आयोग व इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी उशीर केला जात आहे. परंतु आम्ही पंचायत कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय सहन करणार नाही,असे ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी सांगितले.

प्रमुख मागण्या

सर्व पंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ सातवा वेतन आयोग लागू करावा.

पंचायतीमध्ये कामगारांची नेमणूक करण्यासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात यावी.

जे कर्मचारी पंचायतींमध्ये एक वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत त्यांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: व्हायरल होण्याचा हव्यास ‘आंटींला' पडला भारी, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण, म्हणाले,'हे रिलवाले...'

Mumbai Goa Highway: “एक आडवा न तिडवा खड्डा चंद्रावाणी पडला गं…”; मुंबई-गोवा महामार्गाच्या दुर्दशेवर इन्फ्लुएन्सरने मांडली व्यथा VIDEO

शारदीय नवरात्रीतून मिळतायत 'हे' शुभसंकेत, देवीचे वाहन ठरवणार तुमचं भाग्य; वाचा संपूर्ण माहिती

Mumbai Goa Highway Traffic: गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासात कोकणवासीयांची कोंडी, मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामांमुळे त्रस्त

Chandra Grahan 2025: वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण! दिसणार 'ब्लड मून'चा थरार; जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT