Harmal Beach Goa Restaurant Fire Incident Dainik Gomantak
गोवा

Goa Fire Incident: गोव्यात सात रेस्टॉरंट आगीच्या भक्ष्यस्थानी! हरमल किनाऱ्यावर शॉर्ट सर्किट; सुमारे 15 लाखांची मालमत्ता जळून खाक

Harmal Beach Goa Restaurant Fire Incident: ही दुर्घटना खालचावाडा हरमल येथील किनाऱ्यावर शनिवारी पहाटे तोन वाजण्याच्या सुमारास घडली. या भागात बांबूच्या साहित्यापासून उभारलेले सात रेस्टॉरंट होते.

गोमंतक ऑनलाईन टीम

हरमल: खालचावाडा-हरमल येथील किनाऱ्यालगतच्या एका रेस्टॉरंटजवळील वीज खांबावर शनिवारी (4 एप्रिल) पहाटे शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या उडाल्याने बघता बघता सात रेस्टॉरंट आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली. मात्र, सुमारे 15 लाखांची मालमत्ता आगीत खाक झाली.

ही दुर्घटना खालचावाडा हरमल येथील किनाऱ्यावर शनिवारी पहाटे तोन वाजण्याच्या सुमारास घडली. या भागात बांबूच्या साहित्यापासून उभारलेले सात रेस्टॉरंट होते. त्यातील एका रेस्टॉरंटलगतच्या वीज खांबावर शॉर्ट सर्किट होऊन त्याच्या ठिणग्या रेस्टॉरंटवर पडल्या, त्यामुळे बांबूच्या रेस्टॉरंटने लागलीच पेट घेतला. येथील काही लोकांना आग लागल्याचे दिसून येताच त्यांनी लागलीच रेस्टॉरंटमालकांना पाचारण केले आणि रेस्टॉरंटमधील किमती साहित्य बाहेर काढण्यास मदत केली. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे आगीने रौद्र रुप धारण केले आणि सात रेस्टॉरंट भस्मसात झाली. या दुर्घटनेत सात रेस्टॉरंटमालकांचे मिळून सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे, ही सर्व रेस्टॉरंट बंद होती. शिवाय आतमध्ये गॅस सिलिंडर नसल्याने नुकसानीचा आकडा वाढला नाही, असे नागरिक हरेश मयेकर यांनी सांगितले.

वाळूमध्ये अडकला अग्निशामक दलाचा बंब

यावेळी नागरिकांनी पेडणे अग्निशामक दलाला पाचारण केले होते. या दलाची गाडी आली. मात्र, ती किनाऱ्यावरील वाळूमध्ये रुतली. तरीही अग्निशामक दलाच्या जवानांनी तसेच पोलिसांनी पाणी मारून आग विझविण्यास सहकार्य केल्याचे हरेश मयेकर यांनी सांगितले.

मडगावात दोन दुकानांना आग

न्यू मार्केटमधील दोन दुकानांना शुक्रवारी मध्यरात्री आग लागली. यात लाखो रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली, मडगाव अग्रिशामक दलाने त्वरित मदतकार्य केल्याने पुढील अनर्थ टळला. दामोदर बोरकर यांच्या मालकीचे कोल्ड्रिंक शॉप आणि यासीन शेख यांच्या टेलरिंग दु‌कानाला आग लागली. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नसले, तरी शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज मडगाव अग्निशामक दलाने व्यक्त केला आहे.

आगीत चार माडही खाक

एकाच वेळी सात रेस्टॉरंटना लागलेल्या आगीने वेगवान वाऱ्यामुळे क्षणार्धात रौद्र रुप धारण केल्यामुळे या भागातील अंदाजे वीस मीटर उंचीचे माड पूर्णतः जाळून खाक झाले. या दुर्घटनेत एकूण चार माड तसेच काही झाडे करपून गेली. यावरुन आगीच्या ज्वाळा किती उंच होत्या, याचा अंदाज येतो. या आगीमुळे या परिसरातील काही पक्क्या बांधकामांची दारे, खिंडक्या व तावदाने निकामी झाल्याने मोठे नुकसान झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT