Seven protesting Anganwadi teachers Dainik Gomantak
गोवा

'त्या' सात अंगणवाडी शिक्षिकांचे आजपासून बेमुदत उपोषणाला सुरूवात

गोवा सरकारने ज्या सात अंगणवाडी शिक्षिकांच्या सेवा समाप्त केल्या आहेत त्यांनी आजपासून बेमुदत उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: गोवा सरकारने ज्या सात अंगणवाडी शिक्षिकांच्या सेवा समाप्त केल्या आहेत त्यांनी आजपासून बेमुदत उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. अंगणवाडी शिक्षिका, ज्यापैकी काही 24 वर्षांपासून सेवेत आहेत, गेल्या अनेक दिवसांपासून पणजीतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्यांच्या सेवा बंद करण्यात आल्याचा आरोप करत डिसेंबर 2021 मध्ये शिक्षकांनी त्यांना सेवेत परत घेण्याची मागणी केली.

(Seven protesting Anganwadi teachers to go on indefinite hunger strike from today)

आझाद मैदानात धरणे आंदोलन

सरकारविरुद्ध आंदोलनात सहभागी झाल्‍याचे कारण देऊन कामावरून कमी केलेल्‍या सात शिक्षिकांनी गुरुवार दि. 26 मे पासून येथील आझाद मैदानात धरणे आंदोलनास सुरुवात केली होती. याबाबत ‘गोवा युनियन ऑफ अंगणवाडी वर्कर्स’ या संघटनेचे नेते ॲड.हृदयनाथ शिरोडकर म्‍हणाले की, काही महिन्‍यांपूर्वी राज्‍यातील अंगणवाडी शिक्षिकांनी आपल्‍या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले होते.

सरकार दखल घेत नसल्याने पुन्‍हा आंदोलनाशिवाय पर्याय नाही

सरकार दखल घेत नसल्याने पुन्‍हा आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे विद्या नाईक यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी हा विषय आम्‍ही पुन्‍हा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. त्‍यावेळी फाईल पुढे पाठवली आहे. पण संबंधित मंत्र्यांनी ती अडवल्‍याचे त्यांनी सांगितल्‍याचे ॲड. हृदयनाथ शिरोडकर म्‍हणाले. यासाठी आज आम्‍ही फोंडा येथे मंत्री विश्‍वजीत राणे यांची भेट घेण्यास गेलो. पण त्यांनी आम्‍हाला भेट नाकारली,असेही अॅड. शिरोडकर यांनी सांगितले.

2 महिने उलटूनही या शिक्षिकांना न्‍याय नाही

ॲड. शिरोडकर हे काँग्रेसचे नेते आहेत. एका राजकीय पक्षाच्‍या नादाला लागून तुम्‍ही सरकारविरुद्ध आंदोलन केल्‍याचा ठपका ठेवून महिला व बाल कल्‍याण खात्‍याच्‍या संचालक दीपाली नाईक यांनी आंदोलनासाठी नेमलेल्‍या समितीत सहभागी असणाऱ्या 7 शिक्षिकांना कामावरून कमी केले होते. या शिक्षिकांना न्‍याय मिळावा यासाठी आम्‍ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दोनदा भेटलो. तेव्हा त्‍यांनी न्‍याय देण्याचे आश्‍वासन दिले. पण 2 महिने उलटूनही या शिक्षिकांना न्‍याय मिळत नसल्‍याने पुन्‍हा धरणे आंदोलन करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. सरकारने या शिक्षिकांना पुन्‍हा कामावर रूजू करून न घेतल्‍यास उपोषणाचा मार्ग अवलंबू, असा इशारा ॲड. शिरोडकर यांनी दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT