Seven protesting Anganwadi teachers Dainik Gomantak
गोवा

अंगणवाडी सेविकांचे उपोषण सत्र सुरूच

पोलिसांकडून अटक, सुटका तरी निर्धार कायम

दैनिक गोमन्तक

पणजी : येथील आझाद मैदानावरील 18 जूनच्या क्रांतिदिनाच्या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी न्यायासाठी बेमुदत उपोषण करत असलेल्या 7 अंगणवाडी सेविकांना आज पणजी पोलिसांनी दुपारी प्रतिबंधात्मक अटक केली.

त्यांना उपविभागीय दंडाधिकाऱ्यांसमोर जामिनासाठी उभे केले असता घातलेल्या अटी या अंगणवाडी सेविकांनी फेटाळून उपोषण मागे घेणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे कोणतीही अट न घालता शांतता ठेवण्याचे निर्देश देऊन सोडल्यावर उपोषण कायम ठेवण्याचा निर्धार केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंगणवाडी सेविकांना आझाद मैदानावरील बेमुदत उपोषण काही दिवस स्थगित करून तेथून उठण्याची विनंती केली. त्यांना आंदोलनासाठी आझाद मैदान व कांपाल येथील परेड मैदान अशा दोन जागा निश्‍चित करण्यात आलेल्या आहेत. या उपोषणकर्त्यांनी उठण्यास नकार दिल्याने त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. जामिनासाठी त्यांना उपविभागीय दंडाधिकाऱ्यांसमोर उभे करण्यात आले. यावेळी जामिनासाठी त्यांनी घातलेल्या अटी नाकारून सेविकांनी बेमुदत उपोषण मागे न घेण्याचा इशारा दिला.या भूमिकेमुळे न्यायालयीन कोठडीचा रात्री उशिरापर्यंत निर्णय झाला नव्हता.

म्हणून बेमुदत लढा

या अंगणवाडी सेविकांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याने त्यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी हे उपोषण सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी साखळी उपोषण त्यांनी केले होते मात्र सरकारकडून काहीच हालचाली होत नसल्याने बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय काल घेण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT