subhash faldesai Dainik Gomantak
गोवा

सांगे आयआयटी प्रकल्पाला आणखीन एक विघ्न

जागेसंदर्भात याचिका प्रलंबित : प्रकल्पासाठी मंत्री सुभाष फळदेसाई यांचे जिकरीचे प्रयत्न

दैनिक गोमन्तक

सांगे : लोलये, मेळावली यांनी नाकारलेल्या आयआयटी प्रकल्पाला आता सांगेतही उभारण्यास विघ्न येत आहेत. न्यायालयाच्या बाजुला असलेल्या शासकीय जागेवर 7.5 लाख चौ.मी. क्षेत्रात हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पण यापैकी काही जागा आपल्या मालकीची असल्याचे म्हणत सांगेतील नाडकर्णी कुटुंबीयांची याचिका मडगाव जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहे. तर या जमिनीत यापूर्वी आपण लागवड करत होतो असा वीस शेतकऱ्यांचा दावा आहे. या अडचणींवर मात करून हा प्रकल्प सांगेतच व्हावा यासाठी मंत्री सुभाष फळदेसाई यांना जिकरीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.मंत्री फळदेसाई म्हणाले, ‘हा दावा जरी न्यायालयात प्रलंबित असला तरी विवादित जागा सोडून या प्रकल्पासाठी जागा वापरण्यात येणार आहे.

राज्य सरकारचे नाव काढावे

सांगेत 9 लाख चौरस जागा असल्याचा दावा सरकारचा आहे. मात्र, त्यापैकी सुमारे दीड लाख चौरस मीटर जागा आपल्या मालकीची असून त्याजागी सरकारचे नाव काढून टाकावे अशी याचिका नाडकर्णींची आहे. हे प्रकरण सध्या दक्षिण गोव्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश इर्शाद आगा यांच्यासमोर गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. या जमिनीची मालकी सिद्ध करणारी कागदपत्रे असल्याचा दावा नाडकर्णी कुटुंबियांचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: तिस्क-उसगाव येथे मध्यरात्री दुचाकीचा भीषण अपघात

Dabos Valpoi: दाबोस-वाळपई रस्ता धोकादायक अवस्थेत! खोदकामामुळे मार्गाची दुर्दशा; अपघाताची शक्यता

Navelim Bele Junction: नावेली-बेले जंक्शनवर अनेक त्रुटी, रस्ते सुरक्षा समितीकडून पाहणी; साबांखा अधिकारी मात्र अनुपस्थित

Porvorim: पर्वरीतील कोंडीत वाहतूक पोलिसांचे हाल! रखरखत्या उन्हात होते आहे होरपळ

Dodamarg Excise Building: दोडामार्ग ‘अबकारी’ कार्यालयाची दुर्दशा! छपरावर आच्छादन, फुटकी कौले; त्वरित दुरुस्तीची मागणी

SCROLL FOR NEXT