Sesa workers indefinite protest Goa layoffs issue Dainiak Gomantak
गोवा

Goa Worker Layoffs: तोडगा निघेना, संघर्ष वाढला! सेसा कामगारांचे बेमुदत आंदोलन कायम, कंपनीने तोडग्याची तयारी फेटाळली

Goa Mining WorkerLayoffs: सेसा रिसोर्सेस लिमिटेडने कामावरून कमी केलेल्या ८५ कामगारांनी आपल्या मुलाबाळांसह डिंगणे-सुर्ल येथे रस्त्याच्या कडेला धरणे आंदोलन सुरू केले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

साखळी : सेसा रिसोर्सेस लिमिटेडने कामावरून कमी केलेल्या ८५ कामगारांनी आपल्या मुलाबाळांसह डिंगणे-सुर्ल येथे रस्त्याच्या कडेला धरणे आंदोलन सुरू केले आहे. कंपनीने पुन्हा कामावर घेईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कामगारांनी स्पष्ट केले. या कामगारांच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याची तयारी कंपनीने यापूर्वी दर्शविली होती. मात्र, अचानकपणे तोडग्याची प्रक्रिया फेटाळल्याने कामगारांसमोरील संकटे अधिकच गडद झाली आहेत.

कंपनी व सरकारला जाग आणण्यासाठी अखेरचा मार्ग म्हणून बेमुदत धरणे आंदोलनsakhali सुरू करण्यात आल्याचे कामगारांनी सांगितले. जुलै २०२५ मध्ये कंपनीने नोटीस बजावून या कामगारांना अचानकपणे सेवेतून कमी केले होते. त्यानंतर कामगारांनी कंपनी व्यवस्थापन, सरकारी अधिकारी तसेच मुख्यमंत्र्यांकडे अनेकदा पाठपुरावा केला; मात्र कोणताही तोडगा निघालेला नाही. परिणामी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांपुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला असून भविष्याबाबतची चिंता अधिक तीव्र झाली आहे.

दरम्यान, कामगार कपात करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती योजना स्वीकारण्याचा पर्याय देण्यात आला होता. संबंधित अधिकाऱ्यांची आवश्यक परवानगी घेऊन आणि लागू कायदेशीर तरतुदींचे पालन करूनच कामगार कपात प्रक्रिया राबविण्यात आली. करारानुसार कामगारांना देय असलेली सर्व रक्कम अदा करण्यात आली आहे. असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांनी मांडली व्यथा

कामगार समीर आमोणकर म्हणाले, कामगारांच्या प्रश्नावर कंपनीने दोनवेळा बैठका घेऊन दोन पर्याय समोर ठेवले होते. ते पर्याय कामगारांनी मान्य केले होते. मात्र, तिसऱ्या बैठकीत कंपनी व्यवस्थापनाने अचानक माघार घेत आमच्यासमोर ठेवलेला तोडगाच फेटाळून लावला. सर्वकाही मान्य असताना ऐनवेळी हा निर्णय का बदलला, याचे स्पष्टीकरण कंपनीने द्यावे. दशरथ भामईकर म्हणाले, ‘गेली अनेक वर्षे कंपनीत काम करत असताना चार वर्षे आम्ही अर्ध्या पगारावर काम केले.

तेव्हाच नोकरी धोक्यात असल्याची जाणीव झाल्याने आम्ही विविध माध्यमांतून प्रयत्न केले; मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. आज सेसा आणि वेदांत ही वेगवेगळी व्यवस्थापने असल्याचे सांगितले जात असले तरी सर्वकाही एकाच व्यवस्थापनाकडून हाताळले जाते. रूतिका म्हावळींगकर म्हणाल्या, “नऊ महिन्यांपासून घरातील कर्त्या पुरुषांना काम नाही. ते दररोज कंपनीच्या गेटवर जाऊन बसतात; मात्र कंपनीने अद्याप त्यांची दखल घेतलेली नाही. घरात पैसे येत नसल्याने घरखर्च कसा चालवायचा, हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे. मुलांच्या गरजाही पूर्ण करता येत नाहीत. जुनी कर्जे अद्याप फेडलेली नाहीत आणि नवीन कर्ज घेणेही शक्य नाही. अशा परिस्थितीत आम्ही काय करायचे?”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT