IPL 2026 Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचं भवितव्य दुसऱ्यांच्या हातात, चेन्नईविरुद्धच्या पराभवानं बदललं समीकरण; प्लेऑफच्या आशा धूसर

IPL 2026 Playoff Qualification Mathematics: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2026 चा हंगाम आतापर्यंत अत्यंत निराशाजनक ठरला.
Mumbai Indians IPL 2026 Playoff Chances
Mumbai IndiansDainik Gomnatak
Published on
Updated on

Mumbai Indians IPL 2026 Playoff Chances: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2026 चा हंगाम आतापर्यंत अत्यंत निराशाजनक ठरला. 2 मे रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईला 8 गडी राखून एकतर्फी पराभवाचा धक्का बसला, ज्यामुळे त्यांच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांना मोठा तडा गेला. या हंगामात मुंबईने आतापर्यंत 9 सामने खेळले असून, त्यापैकी 7 सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला. असे असले तरी, मुंबई इंडियन्स तांत्रिकदृष्ट्या अद्याप स्पर्धेतून अधिकृतपणे बाहेर झालेली नाही, परंतु इथून पुढे होणारी एक छोटी चूकही त्यांना प्रचंड महागात पडणार आहे.

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) लीग टप्प्यातील 9 सामने पूर्ण केले असून आता त्यांचे 5 सामने शिल्लक आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांना उरलेले पाचही सामने जिंकणे अनिवार्य आहे, जेणेकरुन ते 14 गुणांपर्यंत मजल मारु शकतील. मात्र, आयपीएलच्या इतिहासात 14 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान मिळवणे हे जवळजवळ अशक्य मानले जाते. यासाठी मुंबईला केवळ स्वतःचे सामने जिंकून चालणार नाही, तर गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांसारख्या संघांच्या कामगिरीवरही अवलंबून राहावे लागेल.

Mumbai Indians IPL 2026 Playoff Chances
IPL 2026 Points Table: "दिल्लीचा धमाका, राजस्थानची जयपूरमध्ये नाचक्की!" गुणतालिकेत मोठी उलथापालथ; कॅपिटल्सची प्लेऑफकडे झेप

यापैकी किमान दोन संघांची कामगिरी खालावली आणि इतर संघांच्या निकालांचे समीकरण मुंबईच्या बाजूने लागले, तरच 14 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचण्याची अंधूक संधी त्यांना मिळू शकते.

Mumbai Indians IPL 2026 Playoff Chances
IPL 2026 Playoff Scenario: मुबंई इंडियन्ससाठी 'करो या मरो'ची स्थिती! एका पराभवानं 'प्लेऑफ'चं स्वप्न भंगणार; जाणून घ्या समीकरणं

मुंबई इंडियन्सच्या पुढील आव्हानांचा विचार केल्यास, त्यांचा पुढील सामना 4 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 10 मे रोजी त्यांचा मुकाबला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी होईल, तर 14 मे रोजी त्यांचा सामना फॉर्मात असलेल्या पंजाब किंग्सशी होणार आहे. 20 मे रोजी मुंबईचा संघ कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध दोन हात करेल आणि या हंगामातील त्यांचा लीग टप्प्यातील शेवटचा सामना 24 मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळला जाईल. या पाचही सामन्यांत विजय मिळवणे हे मुंबईसाठी अग्निपरीक्षेपेक्षा कमी नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com