Bird Bath Movement आणि गोव्यातील 150 प्रजातींच्या पक्ष्यांचे छायाचित्र प्रदर्शन

Bird Photo Exhibition: पक्ष्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन 'बांदोडा जैवविविधता व्यवस्थापन समिती'ने आयोजित केलेल्या 'बर्ड बाथ मुव्हमेंट' च्या उद्घाटनाच्या निमित्ताने भरणार आहे.
Bird Bath Movement and Photo Exhibition
Bird Bath Movement and Photo ExhibitionDainik Gomantak
Published on
Updated on

Bird Bath Movement and Photo Exhibition Bandora

पक्षी छायाचित्रकार शैलेंद्र नाईक यांनी पक्ष्यांची घेतलेली छायाचित्रे पाहण्याचा आनंद आगळाच असतो. ते नुसते पक्ष्यांची छायाचित्रे टिपत नाहीत तर रंग आणि आकार यांची मनोरम रचनाच आपल्या छायाचित्रामधून ते कलात्मकपणे सादर करतात. एक उत्कृष्ट पक्षी छायाचित्रकार म्हणून त्यांचा लौकिक आता झाला आहे.

त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपलेल्या पक्ष्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन 'बांदोडा जैवविविधता व्यवस्थापन समिती'ने आयोजित केलेल्या 'बर्ड बाथ मुव्हमेंट' च्या उद्घाटनाच्या निमित्ताने भरणार आहे. शैलेंद्र नाईक यांनी टिपलेली पक्ष्यांची उत्कृष्ट छायाचित्रे पाहण्यासाठी ही एक अपूर्व संधी आहे. 

Bird Bath Movement and Photo Exhibition
Bird Conservation : पक्षीसंवर्धन, अभ्‍यासाला प्राधान्‍य! निरीक्षकांची संख्‍या वाढली

या प्रदर्शनात शैलेन्द्र नाईक यांनी घेतलेली सुमारे १५० पक्ष्यांची छायाचित्रे पाहायला मिळतील. प्रत्येक छायाचित्रावर पक्ष्याच्या प्रजातीचे नाव असल्याने गोव्यातील वेगवेगळ्या प्रजातींच्या पक्ष्यांची ओळख देखील या छायाचित्रांमधून होईल.

Bird Bath Movement and Photo Exhibition
Bird Migration: पक्षी जाय दिगंतरा! गोव्यातील स्थलांतरित पक्षी आणि त्यांचे अधिवास; विशेष लेख

बांदोडा जैवविविधता व्यवस्थापन समिती सुरू करू पाहणाऱ्या 'बर्ड बाथ' चळवळीचे उद्घाटन आज शनिवार, १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता, नागेशी- बांदोडा येथील रवळनाथ मंदिराच्या सभागृहात होणार आहे. त्यानिमित्ताने भरवले जाणारे शैलेंद्र नाईक यांच्या पक्षी छायाचित्रांचे प्रदर्शन १ आणि २ फेब्रुवारी असे दोन दिवस सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६.३० पर्यंत सर्वांसाठी खुले असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com