CM Pramod Sawant In Saligao  Dainik Gomantak
गोवा

Sanquelim News : साखळी परिसरात सर्व पंचायतींमध्ये सेवाकार्य; विविध उपक्रम

रुग्णांना फळे, विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, ज्येष्ठांना चालण्याची उपकरणे वितरित

दैनिक गोमन्तक डिजिटल

साखळी मतदारसंघाचे आमदार तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त साखळी मतदारसंघात विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. सेवा सुशासन व जनकल्याण याअंतर्गत साखळी मतदारसंघातील सर्व पातळीवरील जनतेची सेवा भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

सर्वप्रथम हरवळे येथील रुद्रेश्वर देवस्थान मंदिरात धार्मिक विधी, अभिषेक करण्यात आला. सामाजिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. शाळकरी मुलांना गणवेश, शैक्षणिक साहित्य, वह्या वितरित करण्यात आल्या.

मतदारसंघात काही अपंगत्व आलेल्या वृध्द व इतरांना या सेवा सुशासन व जनकल्याण कार्यक्रमाअंतर्गत चालण्याची उपकरणे, वॉकर प्रदान करण्यात आले. या सर्व नागरिकांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

स्वयंपूर्ण मित्रही झाले सहभागी

भाजप कार्यकर्त्यांनी उत्साह रॅली कढली. पाळी, वेळगे, सुर्ला, हरवळे, न्हावेली, आमोणा, कुडणे या पंचायत क्षेत्रातील ग्रामीण भागातील भाजप कार्यकर्ते आणि मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या चाहत्यांनी खास कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तसेच सरकारी, सामाजिक, लोकोपयोगी योजनांचा अनेकांना लाभ मिळवून देण्यात आला. या कार्यक्रमात स्वयंपूर्ण मित्रही सहभागी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lawrence Bishnoi: मोठी बातमी! कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सात जणांना गोवा पोलिसांनी घेतले ताब्यात

Kerala Cricket League: 10 चौकार, 18 षटकार! संजू सॅमसनलाही सोडले मागे, केरळ क्रिकेट लीगमध्ये विष्णू विनोदचे 'तूफान'

Ganesh Chaturthi: 'या' वेळेत करा गणरायाची प्रतिष्ठापना! सुख, समृद्धी, ऐश्वर्याने भरेल घर; जाणून घ्या कारण

Viral Video: डोक्यावर पट्टी अन् तुटलेला हात घेऊन फलंदाजी... क्रिकेट वेड्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

Bajrang Dal Goa: 'ईद दिवशी जुलूसला परवानगी नको, कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास आम्ही जबाबदार नाही'! बजरंग दलाचा इशारा

SCROLL FOR NEXT