Serendipity Art Festival
Serendipity Art Festival  Dainik Gomantak
गोवा

Serendipity Art Festival मध्ये तुम्ही काय पाहाल?

आदित्य जोशी

आजपासून सुरु होणाऱ्या या महोत्सवात इतके सारे कलाप्रकार सादर होत आहेत त्यातून निवड करणे तुम्हाला बरेच कटीण जाणार आहे. नाटक, संगीत, नृत्य, मुलांसाठी कार्यक्रम, पब्लिक आर्ट, कार्यशाळा, प्रदर्शने, चर्चासत्रे, कलावस्तु, खादयपदार्थ हे सारे पणजी शहरातल्या वेगवेगळ्या भागात आपल्या आस्वादासाठी हजर असणार आहे. तुम्हाला जर या साऱ्या उत्कृष्ट दर्जाच्या कार्यक्रमांचा आनंद घ्यायचा असेल, तर सर्वात प्रथम हे कार्यक्रम कुठल्या स्थळी घडत आहेत याची कल्पना तुम्हाला असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कार्यक्रमांचे वेळापत्रकही तुमच्यापाशी असायलाच हवे. म्हणजे आपल्याला सोईस्कर होईल अशातऱ्हेने तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या कार्यक्रमांची निवड करू शकाल आणि त्यांना हजर राहू शकाल.

पणजी शहरातली एक्साइज बिल्डिंग, ताळगांव पठारावरील नागाळी भाग, पोस्ट ऑफिस संग्रहालय, आझाद मैदान, म्युन्सिपल पार्क, कांपाल भागातला आर्ट पार्क, सांता मोनिका जेटी ही महत्वाची स्थळे आहेत. त्याचबरोबर पणजीचे मल्टी लेव्हल पार्किंग, आल्तिनो येथील पडकी इमारत या जागांवरही महत्वाचे कार्यक्रम मधल्या दिवसात सादर होणार आहेत.

या महोत्सवात होणारे सारेच कार्यक्रम दर्जेदार असतात. त्यामुळे एकाच वेळी कुठल्या कार्यक्रमाला हजर राहू हा प्रश्न पडू शकतो. वेळापत्रकाचा व्यवस्थित अभ्यास केल्यास त्यावर तोडगा सापडू शकतो. अनेक चांगले कार्यक्रम दोन वेळा आयोजित करण्यात आले आहेत. तरीदेखील अनेकदा द्विधा मनस्थिती होऊ शकते. उदाहरणार्थ, नाटक पहावे की नृत्यनाट्य पहावे हा प्रश्न समोर उभा राहू शकतो. अशावेळी, विशिष्ट कलाप्रकाराच्या आपल्या आवडीलाच श्रेष्ठ समजून तिचीच निवड करावी.

'पब्लिक आर्ट ' प्रकारातल्या कलाकृती शहरभर पसरलेल्या आहेत. त्या तुम्हाला दिवसभरात कधीही पाहता येईल. दिवसभरात काही कार्यशाळांनाही तुम्ही हजेरी लावू शकाल. या कार्यशाळांत गोमंतकीय पाककृती, बियर बनवणे, 16 मिमी. कॉन्टेक्ट, प्रिंटींग, आदिवासी पाककृती, स्वदेशी बियाण्यांचे सार्वभौमत्व आणि संरक्षण, वेगवेगळ्या प्रकारची कॉकटेल बनवणे, संगीत आणि शब्दांचा वापर दृश्‍यात कसा करावा, नाटक सादरीकरणावेळी चौथी भिंत मोडून प्रेक्षकांशी संपर्क कसा करावा, शरीर, मंच आणि उर्जेचे आंदोलन यात समतोल कसा राखावा, रंगमंचीय व्यायाम, सेल्फ पॉट्रेट, तरंगती बाग, ध्वनी आणि त्यांचे विविध आयाम, छाऊ आणि समकालीन नृत्ये, कठपुतळ्यासंबंधित विविध तंत्रे इत्यादीबद्दल जागतिक दर्जाचे मार्गदर्शन मिळू शकते.

महोत्सवात मांडलेल्या प्रदर्शनांपैकी एका प्रदर्शनांमधून हलती कंपने, ऊर्जा, ऐकू येणारे अन्‌ न येणाऱ्या आवाजांमधून अवकाश स्वतःला कसे व्यक्त करते हे समजायला मदत होईल. त्यासाठी आर्ट पार्कमधल्या 'साऊंड गार्डन' या प्रदर्शनाला आपल्याला भेट द्यावी लागेल. तिथेच मांडलेल्या एका अन्य प्रदर्शनात 'न्यूमॅटिक ध्वनी’ क्षेत्रात निर्माण झालेल्या वारा, दाब आणि ध्वनी कुठला परिणाम घडवून आणतो त्याचा अनुभव आपल्याला घेता येईल. गोव्याच्या छोटया बाजाराची प्रतिकृतीही आपल्याला एका प्रदर्शनात दिसेल, जिथे काही विशेष वस्तू आपण विकत घेऊ शकाल .

नाटक आणि महोत्सवात सादर होणाऱ्या नाटकांबद्दल आणि नृत्यांबद्दल गेले दोन दिवस 'रंगदेखणी'मधून आपण वाचलेच असेल. 'संगीत' हे देखील सेरेंडिपिटीचे महत्वाचे अंग आहे. छोटे-मोठे सुमारे 39 वेगवेगळे सांगीतिक कार्यक्रम आपल्याला या महोत्सवात अनुभवता येणार आहेत. त्यांत प्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन यांना 'द वर्ल्ड ऑफ पंचम' या कार्यक्रमातून वाहिलेली श्रद्धांजली आहे. 'डोमिनिकन रिपब्लीक'मधल्या 'ला कारिसाल्वे हे पथक पारंपारिक 'साल्वे 'सादर करणार आहे. ‘बी. साईड' या कार्यक्रमातून समकालीन संगीत आपण महोत्सवाचे पूर्ण दिवस ऐकणार आहात. 'ता- धोम ' या कार्यक्रमात शास्त्रीय संगीत आणि समकालीन संगीत यांचा मिलाफ आपण अनुभवू शकाल. टाकून दिलेल्या वस्तूंमधून निर्माण होणाऱ्या लयबद्ध संगीताचा अनुभव घ्यायचा असेल तर 'संजय मेडल अॅण्ड स्ट्रीट ड्रमर्स' यांची मैफल चुकवू नका. सुफी संगीत, रागदारी संगीत, फ्युजन, लोकसंगीत या साऱ्या प्रकारांत देशातील नामवंत कलाकार आपले सादरीकरण करणार आहेत. भारताच्या ईशान्येकडच्या राज्यांमधील संगीत ऐकण्याची संधी यंदा सेरेंडिपिटी देत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : ‘आपत्कालीन’ व्यवस्थेसाठी यंत्रणा सज्ज; दक्षिण गोवा प्रशासन सतर्क

Dam Water : धरणांत पाणी पातळी घटली; सरासरी २ मीटरने जलसाठ्यात घट

Kadamba News : ‘कदंब’चे ‘ते’ कर्मचारी रडारवरच; वन खात्याकडून सखोल तपास सुरू

Artificial Intelligence: ‘’एआय बनला जगासाठी सर्वात मोठा धोका’’, खुद्द गॉडफादरने व्यक्त केली चिंता

Konkan Railway : ‘कोकण रेल्‍वे’ करणार केनियाच्‍या रेल्‍वेची कामे : संतोष कुमार झा

SCROLL FOR NEXT