Senior journalist Vikram Chandra Dainik Gomantak
गोवा

Thinking Economy Hub: गोवा बनू शकतो ‘थिंकिंग इकोनॉमी हब’! ज्येष्ठ पत्रकार विक्रम चंद्रा यांनी व्यक्त केला विश्वास

Senior journalist Vikram Chandra: कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स)’ आणि जैव तंत्रज्ञानासाठी (बायोटेक्नॉलॉजीसाठी) गोव्यात केंद्र उभारण्याची मोठी संधी आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स)’ आणि जैव तंत्रज्ञानासाठी (बायोटेक्नॉलॉजीसाठी) गोव्यात केंद्र उभारण्याची मोठी संधी आहे. तसेच गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक व्यापक आराखडा तयार करणे अत्यावश्यक आहे. शिवाय गोवा ‘थिंकिंग इकॉनॉमी हब’ बनू शकतो, असे मत पत्रकार, तंत्रज्ञानविषयक उत्साही आणि एडीटरजीचे संस्थापक विक्रम चंद्रा यांनी व्यक्त केले.

‘लिव इन गोवा, थिंक इन गोवा’ ही संकल्पना मांडत गोव्यातील बौद्धिक व शास्त्रीय वातावरणाचा उल्लेख केला.योग्य दृष्टीकोन आणि धोरणांद्वारे, २०३० पर्यंत गोवा जागतिक, शाश्वत आणि समृद्धतेचे केंद्र बनू शकते,असेही मत त्यांनी मांडले. गोवा (Goa) चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने आयोजित केलेल्या ‘लीडर्स @ जीसीसीआय’ हा विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. चेंबरचे अध्यक्ष, उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

गोवा २.0 एक जागतिक आणि शाश्वत समृद्धतेचे केंद्र या संकल्पनेवर आधारीत ही चर्चा झाली. या चर्चेदरम्यान चंद्रा यांनी ‘विकसित गोवा २०३०’ चे स्वप्न मांडले. त्यांनी गोव्याच्या अद्वितीयतेवर आणि संभाव्यतेवर भर दिला. चेंबरच्या ‘गोवा @ २०४७ : समावेशक आणि शाश्वत विकास’ (Sustainable Development) या संकल्पनेवर आधारीत दस्तऐवजाचे सादरीकरण करण्यात आले. चंद्रा यांनी भारतीय न्यूज चॅनल्सच्या चुकीच्या व्यवसाय मॉडेलबद्दल सडेतोड मत मांडले.

श्रीनिवास धेंपे, अध्यक्ष ‘जीसीसीआय’

गोव्याला जागतिक दर्जाच्या विद्यापीठांची, उद्योजकीय संस्कृतीची (Culture), मोठ्या प्रतिभावान कामगार वर्गाची, दर्जेदार वैद्यकीय आणि मनोरंजन सुविधा, उत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक आणि जागतिक पातळीवरील संपर्काची आवश्यकता आहे. त्यांनी विकासाला समावेशक आणि शाश्वत ठेवण्यासाठी केंद्रित प्रयत्नांची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narkasur in Goa: 20 फुट उंच, अक्राळ-विक्राळ डोळ्यांचा महाकाय! जगात सापडणार नाही असा अनुभव; कुठे बघाल 'नरकासुर दहनाचा' थरार?

Afghanistan Pakistan Clash: तालिबानच्या हल्ल्याने पाकिस्तानची नाचक्की! सैनिकांच्या पॅन्ट आणि शस्त्रे जप्त; 48 तासांची युद्धबंदी जाहीर Watch Video

Inspirational Story: पुत्र व्हावा ऐसा... मुलाने आई - बाबांसाठी अमेरिकेत खरेदी केले आलिशान घर, कार; US दर्शनही घडवले Watch Video

Diwali Muhurat: गोव्यात धाकटी दिवाळी कधी? प्रदोष काळ ठरू शकतो मोठा 'अडथळा' तारखांचा गोंधळ संपवा; अचूक मुहूर्त वाचा

Goa Live Updates: चंद्रेश्‍वर-भूतनाथ संस्‍थानात सोमवारी पालखी उत्‍सव

SCROLL FOR NEXT