Canacona Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: अवैध वाळू तस्करीबाबत वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकाराला धमकी, दोघांविरोधात गुन्हा नोंद

Canacona Goa Crime News: अवैध वाळू तस्करीबाबत वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Pramod Yadav

Canacona Goa Crime News

अवैध वाळू तस्करीबाबत वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गुरुवारी (14 मार्च) रात्रीच्या सुमारास गोवा-कर्नाटकच्या सीमेवरील पोळे तपासणी नाक्यावर ही घटना घडली.

पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 341, 509 आणि 506 अंतर्गत संशयित आरोपी वीरेंद्र नाईक आणि नरेश नाईक यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी बासुरी देसाई यांनी तक्रार दाखल केली आहे.

बासुरी देसाई अवैध वाळू तस्करीबाबत वृत्त संकलन करण्यासाठी पोळे तपासणी नाका परिसरात गेले असता, संशयितांनी तक्रारदार देसाई यांचा पाठलाग करुन वृत्त प्रसिद्ध केल्यास परिणाम भोगावे लागतील अशा शब्दात धमकी दिली.

यावेळी देसाई यांच्यासोबत असणाऱ्या महिलेला देखील संशयितांनी अश्लिल भाषा वापरत धमकावले असे तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे. संशयितांनी माहिती देण्यास सहकार्य केले नाही तर त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT