journalist Dainik Gomantak
गोवा

Anant Salkar Passed Away: ज्येष्ठ पत्रकार अनंत साळकर यांचे निधन

कुटुंबीयांकडून देहदानाचा निर्णय, उपचारादरम्यान गोमेकॉत घेतला अखेरचा श्‍वास

दैनिक गोमन्तक

पणजी: पिळगाव- डिचोली येथील ज्येष्ठ व आधुनिक विचारांचे पत्रकार अनंत साळकर यांचे आज निधन झाले. रविवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास गोमेकॉ इस्पितळातील अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते गेले 8 दिवस मृत्यूशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाने एका अनुभवी तसेच विविध क्षेत्राबद्दल अभ्यास असलेल्या पत्रकाराची पोकळी निर्माण झाली आहे.

(Senior journalist Anant Salkar passed away)

गेली 22 वर्षे पत्रकारितेत असलेले अनंत साळकर यांनी विविध वृत्तपत्रातून पत्रकारिता केली आहे. त्यांनी आपली पत्रकारिता ‘तरुण भारत’ वृत्तपत्रापासून सुरू केली. त्यावेळी ते या वृत्तपत्राचे आवृत्ती प्रमुख होते. त्यानंतर त्यांनी कोकणी वृत्तपत्र ‘सुनापरान्त’चे संपादक म्हणून काम पाहिले. गोव्यात ‘लोकमत’ वृत्तपत्र सुरू झाल्यानंतर ते 8 वर्षे सहायक संपादक होते. गेल्यावर्षी त्यांनी दै. ‘गोमन्तक’चे सहायक संपादक म्हणून कार्यभार स्वीकारला होता.

त्यांच्या मागे पत्नी अरुंधती व मुलगी मेखला असा परिवार आहे. कुटुंबीयांच्या परवानगीनंतर त्यांचा देह गोमेकॉ इस्पितळाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवारी, 1 ऑक्टोबर रोजी अनंत साळकर हे पणजी येथून आपल्या पिळगाव येथील घरी रात्री 9 च्या सुमारास परतत होते. चोडण फेरीबोटीतून ते पिळगाव दिशेने जात असताना रस्त्यावर त्यांच्या दुचाकीसमोर एक डुक्कर आडवे आले. त्यामुळे त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून रस्त्यावर जोरात आदळल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

देहदानाची प्रक्रीया उद्या

अनंत साळकर यांच्या देहदानाची प्रक्रीया उद्या (ता.10) सकाळी पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजल्यापासून त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्या राहत्या पिळगाव येथील घरी उपस्थित असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT