Car Accident in Navelim Goa  Dainik Gomantak
गोवा

चालकाची डुलकी जीवावर बेतली; नावेलीत कारचा भीषण अपघात

कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दुबईहून परतलेल्या वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : गोव्यात अपघातांचे सत्र अजूनही सुरुच आहे. आज मंगळवारी सकाळी नावेली परिसरात झालेल्या कार अपघातामध्ये एका वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला. हे दाम्पत्य दुबईहून आपली मुलगी व नातीसह दाबोळी विमानतळावर दाखल झाले होते. मात्र घरी परतत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. वाटेत कार चालकाला डुलकी आली.

गाडीवरील त्याचे नियंत्रण गेले आणि त्याच्या कारची धडक आधी रस्त्यावरील डिव्हायडरला, नंतर रस्त्याबाजूच्या असलेल्या कुंपणाला बसली.

गोव्यात मागच्या आठवड्यापासून अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढलेले असतानाच आज पहाटे नावेली येथे झालेल्या अपघातात ज्योकी रोड्रीग्स (72) आणि त्याची पत्नी लीना रोड्रीग्स (74) हे दोघे जागीच ठार झाले. या अपघातात त्यांची मुलगी जेसी रोड्रीग्स (52) व नात वेनिता नोरोन्हा (16) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर इस्पितळात उपचार चालू आहेत. हे चारही जण करमणे गावातील आहेत.

हे चारही जण आज दुबईहून गोव्यात आले होते. सकाळी 5 वाजता ते दाबोळी विमानतळावर पोहोचले. त्यांना घेऊन येण्यासाठी त्यांचे जावई सातान नोरोन्हा यांनी भाड्याची मारुती इको टॅक्सी पाठविली होती. टॅक्सी चालक बेनी परेरा याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पहाटे 3 वाजता तो त्यांना घ्यायला चिंचोणे येथून बाहेर पडला होता. सकाळी 5 वाजता त्यांना घेतल्यावर तो परतत असताना नावेलीहून कुंकळ्ळीला जाण्याच्या वाटेवर त्याचा डोळा लागला आणि त्याने आपली गाडी बाजूच्या डिव्हायडरला ठोकली नंतर जवळ असलेल्या घराच्या कुंपणाला धडक दिली.

या अपघातात वृद्ध दाम्पत्य घटनास्थळीच ठार झाले. तर अन्य दोन जखमींना 108 रुग्णवाहिकेतून हॉस्पिसियो इस्पितळात दाखल केले. या प्रकरणात टॅक्सी चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणी उपनिरीक्षक विश्वजीत ढवळीकर हे तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT