Self Accident in Goa Dainik Gomantak
गोवा

Self Accident in Goa : चालकाचे नियंत्रण सुटले अन् कार रस्ता सोडून थेट....; केपेत भीषण अपघात

जखमींना मडगावातील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले

गोमन्तक डिजिटल टीम

Self Accident in Goa : गेले काही दिवस राज्यातील अपघातांचं सत्र सुरूच आहे. अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबत ट्रक, बसेस या मोठ्या वाहनांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे राज्यातून चिंता व्यक्त केली जातेय.

राज्यातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून विविध उपाययोजना आखण्यात येतायत. पण अद्यापही अपघातांना आळा घालण्यात हवं तसं यश मिळालेलं नाही.

राज्यात वाढत्या अपघाताप्रकरणी आज मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी वाढत्या अपघातांवर आळा घालण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

ते म्हणाले की, गोव्यातील लोक वाहन चालवताना नियम पाळत नाहीत. लोक दारू पिऊन गाडी चालवतात, बेधडक ओव्हरटेकिंग करतात. त्यामुळेच या घटना थांबण्याचे नाव घेत नाही.

अशातच आज दुपारी केपे येथे अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. भरधाव वेगाने जाणारी कार स्पीड ब्रेकरवर उसळून रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात चालक आलेशियस फेर्नांडीस हा 28 वर्षीय युवक जागीच ठार झाला तर त्याचा सहकारी जखमी झाला.

सदर घटना आंबावली केपे येथील आल्बेरी जवळ घडली. घटनेचा केपे पोलिसांनी पंचनामा केला. पोलिस निरीक्षक दिपक पेडणेकर, उपनिरीक्षक शिवराम गावस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

जखमींना मडगावातील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच केपे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT