Dr.Neena Panandikar, Goa  Dainik Gomantak
गोवा

Fatorda News: केंद्र सरकारच्या ‘सीएसआयआर’ योजनेसाठी नीना पाणंदीकर यांची निवड

गोमन्तक डिजिटल टीम

फातोर्डा येथील डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नीना पाणंदीकर यांची केंद्र सरकारच्या सीएसआयआर (कौन्सिल ऑफ सायन्टीफीक ॲण्ड इंडस्ट्रियल रिसर्च)-एस्पायर (महत्वाकांक्षी) योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. वैज्ञानिक संशोधन कार्यात महिलांना प्रोत्साहन देणे व सशक्त करणे,हा या योजनेचा उद्देश आहे. केंद्र सरकारने अशा देशातील ३०० महिलांची निवड केली असून त्यात डॉ. नीना पाणंदीकर यांचा समावेश आहे.

सिमेंटचा जास्तीत जास्त वापर न करता त्या ऐवजी अंड्यांचे, खेकड्यांच्या कवचाचा व सीशेलचा वापर करता येतो, या विषयावर त्या संशोधन करणार आहेत.

आपली निवड हा एक सन्मान असल्याचे आपण मानते, असे सांगून ही निवड म्हणजे व्यवस्थापनाने, सहकाऱ्यांनी व मार्गदर्शकांनी दिलेले सहकार्य व प्रोत्साहनाची पावती असल्याचेही पाणंदीकर यांनी सांगितले.

डॉ. पाणंदीकर यांनी मदतीसाठी सिव्हील इंजिनियरिंग विभागाच्या प्रमुख डॉ. श्वेता प्रसन्ना यांची संयोजक म्हणून नियुक्ती केली आहे.

सीशेल चिरडून त्याचे बारीक पीठ तयार करण्यासाठी डॉ. सूरज मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली मॅकेनिकल इंजिनियरींग विभागाच्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या मशीन तयार करण्यात यश मिळवले आहे. या कामात डॉ. सूरज यांच्या बरोबरच बेवन कुर्रैया, संयम तळावलीकर, श्रेयस सिलिमखान, श्रीतेज कोठारकर आणि यश पॉल यांनी बरेच परिश्रम घेतले.

संशोधन कार्यासाठी २० लाखांचे अनुदान

या संशोधनासाठी तीन वर्षांची मुदत असून त्यासाठी खर्चासाठी २० लाख रुपयांचे अनुदान कौन्सिलने दिले आहे. ही योजना महिलांनी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित क्षेत्रांमध्ये भरीव योगदान द्यावी यासाठी आहे. मुलींनी ही योजना पूर्णपणे जाणून घेऊन आपले कौशल्य व कार्यकुशलतेच्या बळावर त्यात यश संपादन करावे, असे डॉ. पाणंदीकर यांचे म्हणणे आहे. हे संशोधन कार्य आव्हानात्मक असले तरी कदाचित अपयशाने न डगमगता हीच यशाची पायरी असल्याचे समजून प्रयत्न करीत राहणे महत्वाचे असल्याचेही पाणंदीकर म्हणाल्या.

सिमेंटचा वापर कमी करण्यासाठी...

शाश्वत विकासाच्या दृष्टीने सिमेंटचा कमीत कमी वापर करणे, तसेच जमिनीच्या भरावासाठी काचेचा कचरा कमी करणे तसेच वाळू ऐवजी काचेच्या कचऱ्याचा वापर करणे हा या संशोधनाचा मुख्य विषय असेल. विटा व सिमेंटचे ब्लॉक्स बनविणाऱ्या उत्पादकांसाठी हा प्रकल्प कचऱ्याचा पुर्नवापर व प्रक्रियेसाठी व्यवहार्य ठरणारा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT