(IFFI 52) इंडियन पॅनोरमासाठी (Indian Panorama) 25 चित्रपटांची निवड  Dainik Gomantak
गोवा

IFFI 52मध्ये इंडियन पॅनोरमासाठी 25 चित्रपटांची निवड

20 माहितीपटही दाखवणार, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान महोत्सव, 221 समकालीन भारतीय चित्रपटांमधून हे 25 चित्रपट निवडण्यात आले आहेत. या पॅकेजमध्ये भारतीय चित्रपट सृष्टीतील विविधरंग आणि वैविध्याचे दर्शन घडते.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात (Goa) 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (IFFI 52) इंडियन पॅनोरमासाठी (Indian Panorama) 25 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. या भारतीय चित्रपटांची यादी आज जाहीर करण्यात आली. चित्रपट निवड समितीच्या ज्युरी सदस्यांमध्ये भारतीय चित्रपट सृष्टीतील नामवंत चित्रपट निर्माते आणि इतर मान्यवरांचा समावेश आहे. फिचर आणि नॉन फिचर अशा दोन्ही चित्रपटांची निवड करण्यासाठी ज्युरी सदस्यांच्या वैयक्तिक अनुभवांच्या आणि अभ्यासाच्या आधारे या पॅनोरमाची निवड करतात.

221 समकालीन भारतीय चित्रपटांमधून हे 25 चित्रपट निवडण्यात आले आहेत. या पॅकेजमध्ये भारतीय चित्रपट सृष्टीतील विविधरंग आणि वैविध्याचे दर्शन घडते. फिचर फिल्मच्या ज्युरी सदस्यांमध्ये १२ सदस्य असून, या समितीच्या अध्यक्षपदी एस.व्ही. राजेंद्र सिंग बाबू आहेत. तसेच या ज्युरी सदस्यांमध्ये असे सदस्य आहेत ज्यांनी आपल्या कारकीर्दीत विविध उत्तम चित्रपटांची निर्मिती केली असून अनेक चित्रपट संस्था किंवा व्यावसायिक यांचे ते प्रतिनिधी आहेत. हे सर्व सदस्य मिळून भारतीय चित्रपटसृष्टीचे समग्र प्रतिनिधित्व करतात:

203 समकालीन भारतीय नॉन फिचर चित्रपटांमधून निवडलेले चित्रपट आपल्या प्रस्थापित आणि उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांच्या नोंदी घेण्याच्या, शोधकवृत्तीचे आणि मनोरंजन करण्याच्या क्षमतेचे तसेच समकालीन भारतीय मूल्यांचे उत्तम उदाहरण आहे.

वेद.. द व्हिजनरीचा समावेश

एकूण 20 नॉन - फिचर फिल्म्स इफ्फीमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत. भारतीय पॅनोरमामध्ये कथाबाह्य चित्रपट विभागात ज्युरींनी निवड केलेला उदघाटनाचा चित्रपट म्हणजे ‘वेद... द व्हिजनरी’ हा राजीव प्रकाश यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे.

सात परीक्षक

नॉन-फिचरच्या सात परीक्षकांच्या चमूचे नेतृत्व प्रसिद्ध माहितीपट निर्माते एस नल्लामुथु यांनी केले. यामध्ये आकाशादित्य लामा (चित्रपट निर्माते), सिबानू बोरा (माहितीपट निर्माते), सुरेश शर्मा (चित्रपट निर्माते), सुब्रत ज्योती नियोग (चित्रपट समीक्षक), मनीषा कुलश्रेष्ठ (लेखिका), अतुल गंगवार (लेखक) यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींगच्या निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

Crime News: देवगड- फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला मृतदेह, घात की अपघात?

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

SCROLL FOR NEXT