Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

ओळखच ठरली अत्याचारासाठी कारणीभूत

लैंगिक अत्याचार प्रकरण : संशयिताने वापरलेली चार चाकी जप्त

दैनिक गोमन्तक

पर्वरी: बिठ्ठोण येथील अल्पवयीन युवतीचे (Underage girl) अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार (Goa Crime) प्रकरणी अटक केलेल्या संशयित जावेद शेख उर्फ कबीर याला आज म्हापसा न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर केले असता त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनविण्यात आली आहे. जावेद शेख याने युवतीवर अत्याचार करण्यासाठी वापरलेली चार चाकी (Car) पोलिसांनी जप्त केली आहे.

जावेद शेख याची बायको दोन वर्षांपूर्वीच त्याला सोडून गेली आहे. सध्या हाळीवाडा बिठ्ठोण येथे तो एकटाच राहतो. तसेच पिडीत युवतीच्या वडिलाचे एका वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. सध्या आई आणि एक भाऊ असे तिघेजण राहतात. पिडीत युवती आणि त्याची आई पुंडलिक नगर येथील एका सदनिकेत घरकाम करण्यासाठी गेले असता. तेथील तिसऱ्या मजल्यावरून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने खाली उडी मारली. त्यात तिचे दोन्ही पाय मोडले आहेत. संशयीत आरोपीने पिडीत युवतीला जबरदस्तीने आपल्या कारमध्ये कोंबले व तिचे अपहरण केले. तिला वेरे येथे नेवून तिच्यावर गाडीतच लैंगिक अत्याचार केला. पिडीत मुलगी संशयिताच्या शेजारी राहत असल्याने संशयिताने ओळखीचा फायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेचा पर्वरी परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

युवती टोकाची भूमिका का घेते

या घटनेनंतर एखादी युवती तीन मजल्यावरून खाली उडी मारून जीवन संपविण्याचा प्रयत्न करते यावरून सर्व स्पष्ट होत आहे. एखादी युवती इतकी टोकाची भूमिका का घेते ? याचाही विचार होणे गरजेचे आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळापर्यंत जावून संशयित आरोपीला कठोर शिक्षा केली पाहिजे. सद्या पर्वरीत दिवशेंदिवस गुन्हे वाढत आहेत. गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त आहे का? याचीही चौकशी होणे गरजेचे आहे, असे उत्तर गोवा भाजप अध्यक्ष महानंद अस्नोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT