Sangavi Police Arrested Accussed  Dainik Gomantak
गोवा

Pune Crime: ड्युटीचा पॉईंट बदलला म्हणून केला खून; 16 वर्षापासून फरार सुरक्षा रक्षकाला गोव्यातून अटक

Pune Police: खून केल्यानंतर आरोपी त्याच्या मूळ गावी न जाता वेगवेगळ्या राज्यात जाऊन आपले अस्तित्व लपवून राहत होता.

Pramod Yadav

Pune Police Arrest Murderer From Goa

पुणे: सोळा वर्षांपूर्वी सांगवी येथे खून करुन फरार झालेल्या आरोपीला गोव्यातून अटक करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असेलल्या आरोपीने किरकोळ कारणावरून एका व्यक्तीचा खून केला. त्यानंतर तो ठिकठिकाणी वास्तव्य बदलून राहू लागला. अखेर १६ वर्षानंतर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने त्याला गोव्यातून अटक केलीय.

सुनील अशोकराव कांगणे (वय ३९, रा. आगशी, गोवा. मूळ रा. नांदेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने सन २००९ मध्ये सुभाष सोपं धाकतोंडे (वय ५५, रा. रहाटणी) याचा खून केला होता. आगशी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन, सांगवी पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलीस उपयुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २००९ मध्ये सुनील कांगणे हा सांगवी परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. सुभाष धाकतोंडे यांनी त्याचा ड्युटीचा पॉईंट बदलला. या कारणावरून सुनील याने सुभाष यांचा धारदार शस्त्राने वार करत खून केला. खून केल्यानंतर तो पळून गेला.

सुनील हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील आहे. खून केल्यानंतर तो त्याच्या मूळ गावी न जाता वेगवेगळ्या राज्यात जाऊन आपले अस्तित्व लपवून राहू लागला. मात्र पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस त्याच्या मागावर होते.

गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अंमलदार प्रमोद गर्जे यांना माहिती मिळाली कि, सुनील कांगणे हा गोव्यात राहत आहे. त्यानुसार पोलिसांचे एक पथक गोव्याला रवाना झाले. पोलिसांनी गोव्यातून सुनील याला अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलीस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, गणेश महाडिक, सचिन मोरे, प्रमोद गर्जे यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT