'गांधींना एका हाताने नमन करायचे आणि दुसऱ्या हाताने गोळी मारायची'; प्रोटोकॉलवरुन आलेमाव यांचा सरकारवर निशाणा

LOP Yuri Alemao On Goa CM Sawant: मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर देताना युरी आलेमाव यांनी मला कोणी प्रोटोकॉल शिकवण्याची गरज नसल्याचे सांगितले.
Goa CM Pramod Sawant And LOP Yuri Alemao
Goa CM Pramod Sawant And LOP Yuri AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

पर्वरी: महात्मा गांधींना एका हाताने नमन करुन दुसऱ्या हाताने गोळी मारतात हा कोणाचा प्रोटोकॉल, असा सवाल उपस्थित करत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. राज्यपालांचे अभिभाषण संपल्यानंतर त्यांना सभागृहाबाहेर सोडण्यास युरी आलेमाव न आल्याने इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याचा दावा करत, मुख्यमंत्री सावंत यांनी आलेमाव यांच्यावर प्रोटोकॉल माहिती नसल्याची टीका केली.

मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर देताना युरी आलेमाव यांनी मला कोणी प्रोटोकॉल शिकवण्याची गरज नसल्याचे सांगितले. "अनेकवेळा इतिहास रिपीट होत राहतो. देशातील सर्वात जास्त बेरोजगारी गोव्यात आहे. राज्याची सध्याची आर्थिक स्थिती हा इतिहास आहे. कोणीच मला येथे प्रोटोकॉल शिकवण्याची गरज नाही. महात्मा गांधींना एका हाताने नमन करुन दुसऱ्या हाताने गोळी मारतात हा कोणाचा प्रोटोकॉल, याचे उत्तर त्यांनी पहिल्यांदा द्यायला हवं", असे युरी आलेमाव म्हणाले.

Goa CM Pramod Sawant And LOP Yuri Alemao
Goa Assembly Session: गोव्यातील वीजप्रणाली होणार 'भूमिगत'! सुरक्षित वीजपुरवठ्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प; राज्यपाल पिल्लई

"पहिल्या दिवशी सभागृहात काय झाले हे गोव्यातील लोकांचे मत मांडण्यासाठी केले. आज देखील सभागृहात विविध प्रश्न मांडले जातील. सभागृहात सर्व विरोधक एकत्र असून, हे सरकार अपयशी असल्याचे दाखवण्यासाठी आम्ही प्रश्न विचारत राहू", असेही आलेमाव म्हणाले. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी आलेमाव यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्या टीकेला वरील उत्तर दिले.

Goa CM Pramod Sawant And LOP Yuri Alemao
Governor Speech: गेल्या 5 वर्षांत गोव्याची प्रगती 'उल्लेखनीय'! आर्थिक दिशा योग्य मार्गावर; राज्यपालांनी केले प्रशासनाचे अभिनंदन

हरित करात घोटाळा; आलेमाव सभागृहात आक्रमक

कोळसा वाहतूक करणाऱ्या कंपन्यांकडून हरित कर गोळा करण्यात येतो, यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरु होताच केला. दरम्यान, ५० टक्के हरित कर गोळा झाल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सभागृहात सांगितले. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उरलेला कर देखील गोळा केला जाईल, असे आश्वासन सावंत यांनी यावेळी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com