Goa Medical College Hospital Dainik Gomantak
गोवा

GMC: गोमेकॉत आता कडक सुरक्षा! टास्क फोर्स समितीची स्थापना

Goa GMC: गोमेकॉतील सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी येथील सुरक्षा रक्षकांना खास प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अलीकडे पश्‍चिम बंगालमध्ये हॉस्पिटलमध्ये घुसून महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या घटनेनंतर देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांतील डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. यातून बोध घेत गोमेकॉतील सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी येथील सुरक्षा रक्षकांना खास प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासाठी गोमेकॉच्या डीनच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समिती स्थापना करण्यात आली आहे. आठ दिवसांपूर्वी सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण देण्यासंदर्भात आगशी पोलिसांना पत्रही पाठवण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा फायदा सुमारे ५०० सुरक्षारक्षकांना होणार आहे.

टास्क फोर्स समितीची दुसरी बैठक नुकतीच झाली. समितीचे अध्यक्षपद डीन शिवानंद बांदेकर यांच्याकडे आहे तर सचिव म्हणून डॉ. राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बैठकीत पोलिस निरीक्षक देखील उपस्थित होते.

गोमेकॉतील ब्लॅकस्पॉट ठरविले

टास्क फोर्स समितीच्या बैठकीत गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील ब्लॅकस्पॉट नक्की करण्यात आले आहे. त्यानुसार तेथे लोकांना सुरक्षित वाटावे यासाठी नियोजन करण्यात येईल. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु असून लवकरच ही समस्या सुटेल असा विश्वास आहे.

पाच तुकड्यांना प्रशिक्षण देणार

आठ दिवसांपूर्वी महाविद्यालयाकडून पोलिसांना पत्र लिहिण्यात आले आहे. प्रशिक्षण ५ तुकडीत होणार आहे. एका तुकडीत १०० सुरक्षा रक्षक असणार आहेत. त्यानुसार सुमारे ५०० सुरक्षा रक्षकांना हे प्रशिक्षण मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे डॉ. राजेश पाटील यांनी कलकत्ता येथील बलात्कार प्रकरण होण्यापूर्वी सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण द्यावे यासाठी गृह खात्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठकही केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT