Express Dainik Gomantak
गोवा

Secunderabad Vasco-Da-Gama Express: तेलंगणातून गोव्यासाठी धावणार एक्सप्रेस; रविवारी शुभारंभ, जाणून घ्या वेळापत्रक

Secunderabad Vasco-Da-Gama Express: दक्षिण मध्य रेल्वे (SCR) ने सिकंदराबाद-वास्क--दा-गामा-सिकंदराबाद द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस सुरू केली आहे.

Pramod Yadav

Secunderabad Vasco-Da-Gama Express

तेलंगणातून गोव्यासाठी एक्सप्रेस ट्रेन सुरु होणार आहे. सिकंदराबाद ते वास्क--दा-गामा ट्रेनचा येत्या रविवार (०६ ऑक्टोबर) पासून शुभारंभ होणार आहे. आवड्यातून दोन दिवस धावणाऱ्या या ट्रेनसाठी राज्यातील राजकीय नेते आग्रही होते.

दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वे (SCR) ने या ट्रेनसाठी हिरवा कंदील दाखवला असून, ०९ ऑक्टोबरपासून ही ट्रेन प्रवाशांच्या नियमित सेवेत राहणार आहे.

असे आहे टाईम टेबल (Secunderabad Vasco-Da-Gama Express Timetable)

दक्षिण मध्य रेल्वे (SCR) ने सिकंदराबाद-वास्क--दा-गामा-सिकंदराबाद द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस सुरू केली आहे.

१) सिकंदराबाद - वास्को-दा-गामा: (ट्रेन क्र. १७०३९)

(बुधवार आणि शुक्रवार) ०९ ऑक्टोबरपासून नियमित सुरु होणार.

२) वास्को-दा-गामा-सिकंदराबाद एक्सप्रेस: (ट्रेन क्रमांक १७०४०)

(गुरुवार आणि शनिवार) १० ऑक्टोबरपासून नियमित सुरु होणार.

डब्बे

या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, 2एसी, 3एसी, स्लीपर आणि जनरल सेकंड क्लास कोच असतील. ट्रेनचे बुकिंग आजपासून (०४ ऑक्टोबर) सुरू झाले आहे, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Secunderabad Vasco-Da-Gama Express Fare

तिकीट दर (Ticket Fare)

सिंकदराबाद ते वास्को दा गामा ट्रेनसाठी रविवारी सुटणाऱ्या शुभारंभाच्या ट्रेनसाठी स्लिपरसाठी ५६५ रुपये मोजावे लागतील तर, एसी ३ इकॉनॉमीसाठी १४१५ आणि एसी टीअर (३ए) साठी १५३० रुपये मोजावे लागतील. (Secunderabad Vasco-Da-Gama Express ticket Booking)

Secunderabad Vasco-Da-Gama Express Booking

तर, बुधवारपासून नियमित सुरु होणाऱ्या या ट्रेन सेवेसाठी स्लिपरसाठी ४४० रुपये तर, एसी ३ इकॉनॉमीसाठी ११०० एसी टीअर (३ए) साठी ११८५ रुपये मोजावे लागतील.

ट्रेनसाठी आगाऊ बुकिंग सुरु झाले असून, IRCTC च्या संकेतस्थळावरुन तिकिट बुकिंग करता येईल. अथवा जवळच्या रेल्वे स्थानक किंवा ऑनलाईन पद्धतीने तिकिट बुक करता येईल. अधिक माहितीसाठी www.irctc.co.in या संकेतस्थळाला भेट देता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT