पणजी : उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी राज्य विधानसभा अधिवेशन 11 जुलैपासून विधानसभेचे अधिवेशन संपेपर्यंत जमावबंदीचा आदेश काढला आहे. या काळात पर्वरी येथील विधानसभा आवाराच्या सभोवतालच्या 500 मीटर भागात निर्बंध लादण्यात आले आहेत.
यासोबतच पणजी पोलिस स्टेशनच्या क्षेत्रांतील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, गल्ली, रस्ता, चौक किंवा कोणत्याही खुल्या जागेत पाच किंवा त्याहून अधिक व्यक्ती जमा होण्यास आणि मिरवणूक काढण्यास किंवा आयोजित करण्यास, बंदुका किंवा लाठी, तलवार, भाला किंवा सुरा यासारखी शस्त्रे जवळ बाळगण्यास, लाऊडस्पीकरचा वापर करण्यास, घोषणा देण्यास आणि फटाके जाळण्यास बंदी पणजीत लागू केली आहे.
कामावरील लोकसेवक, परवानगी असलेले लग्न समारंभ, अंत्यविधी किंवा कोणताही खास प्रसंग किंवा जिल्हा न्यायदंडाधिकारी, अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी, उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या मताप्रमाणे विश्वसनीय प्रसंग ज्यांना संबंधित जिल्हा न्यायदंडाधिकारी, अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी किंवा उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांकडून पूर्व लेखी परवानगी घेतली आहे, त्यांना ही बंदी लागू होणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.