Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: उमेदवार निवडीसाठी भाजपकडून कार्यकर्त्यांमध्ये गुप्त मतदान

भाजप परिस्थिती संतुलित करण्याच्या प्रयत्नात...

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात भारतीय जनता पक्ष (भाजप) पेचप्रसंगात अडकला आहे. कारण त्यांच्याकडे उमेदवारीसाठी तीन इच्छुक उमेदवार आहेत. त्यापैकी आमदार बाबुश मोन्सेरात, उत्पल पर्रीकर आणि माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळीकर हे आहेत. निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल यांना तिकीट नाकारण्याचे संकेत दिले असले तरी, ते पणजी भाजप मंडळातील त्यांच्या समर्थकांसह प्रचारात आहेत. मोन्सेरात यांच्याकडे झुकता कल दिसून येत असतानाही भाजप परिस्थिती संतुलित करण्याचा प्रयत्न करत आहे. (Secret ballot among goa BJP workers for candidate selection)

शुक्रवारी, कुंकळ्ळीकर म्हणाले की "प्रत्येकजण पक्षाच्या तिकिटासाठी दावा करू शकतो. पणजीमध्ये (Panjim) कोणाला उमेदवार म्हणून निवडायचे यावर कार्यकर्त्यांमध्ये गुप्त मतदान करण्यात आले होते. आणि पक्षाचे हे पाऊल लोकशाही प्रक्रियेला बळकटी देत आहे. प्रत्येकाने नेता बनण्याची इच्छा बाळगली पाहिजे आणि अशा प्रकारे राजकीय व्यवस्था कार्य करते, ”असे ते म्हणाले.

उत्पल पर्रीकरांना डावलून बाबूशना पणजीत उमेदवारी?

पणजीत उत्पल पर्रीकरांऐवजी बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारीचे संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) हे पणजीतून भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र पुन्हा एकदा उमेदवारीची माळ बाबूश मोन्सेरात यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. उत्पल पर्रीकर हे मनोहर पर्रीकर यांचे मुलगे असून पणजी विधानसभेच्या (Goa Assembly Election) जागेसाठी आग्रही आहेत.

उत्पल पर्रीकर यांची भाजपवर टीका करत

उत्पल पर्रीकर भाजपवर टीका करत "सध्याचे राजकारण मला मान्य नाही; जिंकण्याची क्षमता, सचोटी, चारित्र्य याचा राजकारणात काही फरक पडत नाही का? मनोहर पर्रीकर यांनी प्रतिनिधीत्व केलेल्या मतदारसंघातून तुम्ही गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीला निवडणूक लढवण्याची परवानगी देत ​​आहात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच त्यात बदल व्हायला हवा आणि म्हणून मी प्रयत्न करत आहे; वडिलांसोबत काम करणारे सर्व ज्येष्ठ नेते आज माझ्यासोबत काम करत आहेत. मी जनतेत जाहीरपणे जात असून, येथे पक्ष स्थापन करणारे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत असे उत्पल पर्रीकर म्हणाले.

उत्पल पर्रिकरांना शिवसेनेचा पाठिंबा

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर मोठे नेते, भाऊसाहेब बांदोडकरांनंतर गोव्यावर प्रभाव असलेला माणूस. त्यांच्या मृत्यूनंतर उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) राजकारणात येतोय. पण त्यांचा अपमान केला जातोय. उत्पल यांनी विधानसभा निवडणुकीत (Goa Legislative Assembly Election 2022) राजकीय पाऊल उचलण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्या उमेदवारीला शिवसेना पाठिंबा देण्यास तयार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

खरी कुजबुज: सरकारची अशीही हुशारी!

SCROLL FOR NEXT