पणजी: बनावट दस्तावेजाच्या आधारे जमिनी हडप करून त्याची विक्री केलेल्या आसगाव प्रकरणात विक्रांत शेट्टी याच्या अटकेनंतर सांतिनेझ-पणजी येथील महंमद सुहैल शाफी (45) याला विशेष तपास पथकाने आज अटक केली.
(Second arrest in land grab case In goa, SIT action)
बनावट दस्तावेजाद्वारे जमीन हस्तांतरण व हडप प्रकरणातील तो मुख्य सूत्रधार आहे. एसआयटीकडे नव्या 7 तक्रारी आल्या असून पोलिसांत नोंद झालेल्या जुन्या चार प्रकरणांची चौकशी सुरू झाली आहे. ‘एसआयटी’मध्ये पोलिस मनुष्यबळ वाढवल्याने या तपासकामालाही वेग आला आहे.
एसआयटीचे प्रमुख तथा पोलिस अधीक्षक निधीन वॉल्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सुहैल याच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे कक्षाकडे दोन, तर पर्वरी पोलिस स्थानकात एक आणि सध्याची तक्रार मिळून चार गुन्हे नोंद झाले आहेत. संशयित महंमद सुहैल शाफी याच्याविरुद्ध बनावट दस्तावेजाचा वापर करून लोकांना जमिनींची विक्री केली व फसवणूक केल्याप्रकरणी 20 ऑक्टोबर 2013 रोजी पर्वरी पोलिस स्थानकात नोंद झाला होता.
या प्रकरणाचे आरोपपत्र 31 जानेवारी 2022 रोजी म्हापसा दिवाणी न्यायालयात दाखल केले होते. दुसरा गुन्हा 11 फेब्रुवारी 2014cरोजी आर्थिक गुन्हे कक्षात नोंद झाला. त्याचे आरोपपत्र 21 डिसेंबर 2018 रोजी पणजी दिवाणी न्यायालयात दाखल केले होते. तिसरा गुन्हा आर्थिक गुन्हे कक्षाकडे 26 फेब्रुवारी 2014 रोजी नोंद होऊन त्याचे आरोपपत्र 31 जानेवारी 2020 रोजी म्हापसा दिवाणी न्यायालयात दाखल केले होते. या सर्व आरोपपत्रांवरील सुनावणी न्यायालयात सुरू आहे. त्याने आतापर्यंत कोट्यवधींचे बोगस जमीन व्यवहार केल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना माहिती समोर आली आहे. त्याच्या बँक खात्याची माहिती पोलिसांनी जमवण्यास सुरवात केली आहे.
तपासाची गती वाढली
जमीन हडप प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन केलेल्या ‘एसआयटी’मध्ये २२ पोलिसांची वर्णी लावली आहे. बुधवारपर्यंत त्यांना दाखल होण्याच्या आदेशानुसार काहीजण आज हजर झाले.एसआयटीकडे आलेल्या तक्रारींच्या चौकशीसाठी ‘पोलिस टीम’ स्थापली असून पोलिस अधीक्षक निधीन वॉल्सन याचा आढावा घेत असल्याने तपासगती वाढली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.