Savitri Kavalekar Dainik Gomantak 
गोवा

माझ्‍या विजयावर शिक्कामोर्तब, सामाजिक कार्याची पोचपावती मिळणार; सावित्री कवळेकर

जनतेच्या सेवेत सक्रियरित्या कार्य करताना आपण कधी जात-धर्म पहिला नाही; सावित्री कवळेकर

दैनिक गोमन्तक

सांगे : सांगे मतदारसंघात विधानसभा निवडणूक चुरशीची होणार असली तरी आपण प्रचंड मताधिक्‍क्याने निवडून येणार असल्याचा विश्‍‍वास अपक्ष उमेदवार सावित्री कवळेकर (savitri kavlekar) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्‍यक्त केला. गेल्या पाच वर्षांत आपण जे कार्य केलंय, त्याची पोचपावती सांगेतील जनता उद्या मतदानादिवशी आपल्‍या विजयावर शिक्कामोर्तब करून देईल, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

गेल्या निवडणुकीत (Election) आपल्याला अल्प वेळ मिळाला होता. पण त्यानंतर आपल्याला सलग पाच वर्षे समाजकार्य करण्यासाठी वेळ मिळाला. जनतेच्या सेवेत सक्रियरित्या कार्य करताना आपण कधी जात-धर्म पहिला नाही. निवडणुकीत कोण आपल्याला मदत करणार की नाही याचा विचार न करता सढळ हस्ते सहकार्य केले.

आपल्याला जे शक्य आहे ते कठीण प्रसंगात जनतेला देण्याचा प्रयत्न केला. जनतेने आपल्याला आपलेसे केलेय. याचा परिणाम विरोधकांवर होऊ लागल्याने ते आता आपल्यावर खोटे आरोप करून अफवा पसरवू लागले आहेत, असे सावित्री यांनी सांगितले.

एक महिला उमेदवार असूनही आपण सांगे मतदारसंघातील प्रत्येक मतदाराच्या घरापर्यत जाण्याचा प्रयत्न केलाय. 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आपल्याला एक संधी देण्याचे आवाहन केलंय. मतदारांनी तितक्याच उत्साहाने आपले स्वागत करून आत्मविश्वास वाढविलाय.

निवडणूक काळात आपण जनतेला दिलेला शब्द खरा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे. सांगे (Sanguem) मतदारसंघात अनेक समस्या आहे, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे सावित्री म्‍हणाल्‍या. ग्रामीण भागात विखुरलेल्या मतदारसंघात विकास म्हणजे काय ते जनतेला पाहता आले नाही. प्रत्यक्ष काम वेगळे आणि घोषणा वेगळ्या असतात.

सामाजिक क्षेत्रात आपले कार्य सांगेतील जनतेने पाहिले आहे. त्‍यामुळेच मतदारांनी मतदारसंघाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून अपक्ष उमेदवार म्हणून ‘कपाट’ या निशाणीवर शिक्का मारून आपल्याला संधी द्यावी, असे आवाहनही सावित्री कवळेकर यांनी केले आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत गेले कित्‍येक दिवस फिरणाऱ्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानते. त्‍यांच्‍या सहकार्यामुळेच आज आपण विजयापर्यंत पोचले आहे, केवळ त्या विजयावर आज शिक्कामोर्तब होणे बाकी आहे, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT