Covid 19 Vaccination Dainik Gomantak
गोवा

खलाशांना प्राधान्याने बूस्टर डोस द्या; एनआरआय आयोगाची मागणी

अनेक परदेशी कंपन्यांनी खलाशांना लसीचा (Vaccine) तिसरा डोस घेणे बंधनकारक केले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या खलाशांसाठी लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोस यामधील 9 महिन्यांच्या कालावधीची अट काढून टाकण्यात यावी किंवा त्यात बदल करावा. खलाशांना प्राधान्याने बूस्टर डोस द्यावा, अशी मागणी एनआरआय (NRI) आयोगाने आरोग्य विभागाला पत्र लिहून केली आहे.

NRI संचालक अँथनी डिसोझा यांनी मंगळवारी अंडर सेक्रेटरी (आरोग्य) यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, शिपिंग महासंचालकांनी 21 डिसेंबर 2020 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात खलाशी अत्यावश्यक सेवा कर्मचारी असल्याचे स्पष्ट केले आहे.

अनेक परदेशी कंपन्यांनी खलाशांना लसीचा (Vaccine) तिसरा डोस घेणे बंधनकारक केले आहे. डोस न घेतलेल्या खलाशांना जहाजावर प्रवेश करण्यास अथवा काम करण्यास परवानगी नाकारण्यात येत आहे.

गोवा (Goa) सीमेन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष फ्रँक व्हिएगास म्हणाले, “आम्हाला बूस्टर डोस सहा महिन्यांनंतर घेता येईल असे सांगण्यात आले होते. मात्र, तसे झालेले नाही. आम्ही सरकारच्या निर्णयाची वाट पाहत आहोत.”

खलाशांच्या राष्ट्रीय संघटनेकडून 50 लाख रुपयांची विमा योजना लॉन्च करण्यात आली आहे. सध्या कार्यरत असलेल्या 55 वर्षांपर्यंतच्या खलाशांना याचा थेट लाभ मिळणार आहे. महासंचालक अमिताभ कुमार यांनी नुकतीच NUSI सुरक्षा कवच नावाची विमा योजना लॉन्च केली आहे. एलआयसीच्या माध्यमातून ही विमा योजना लागू करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT