Betalbatim Agriculture Loss Dainik Gomantak
गोवा

Betalbatim: समुद्राचे खारे पाणी थेट शेतात! बेताळभाटी येथील प्रकार; 30 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Betalbatim Farmers: गेले आठ दिवसांपासून खारे पाणी शेतात येत होते. शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आणून दिली होती. काही ठिकाणी लोकांना याच पाण्यातून जावे लागले.

Sameer Panditrao

सासष्टी: समुद्राचे खारे पाणी थेट शेतात घुसल्‍याने थोंडावाडो-बेताळभाटी येथील ३० शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. दरम्‍यान, शनिवारी सकाळी स्थानिक आमदार व्‍हेंझी व्हिएगस यांनी कामगार पुरविल्‍यामुळे शेतात जाणारी पाण्याची वाट अडविली. त्यामुळे आणखी होणारी प्रचंड नुकसानी ठरली.

गेले आठ दिवसांपासून खारे पाणी शेतात येत होते. शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आणून दिली होती. काही ठिकाणी लोकांना याच पाण्यातून जावे लागले. गेल्या वर्षीही अशीच स्थिती उद्‌भवली होती.

पण जेसीबीचा वापर करून तेव्हा पाणी दुसरीकडे वळविण्यात आले होते. पण यंदा सरकारने अजून काहीच उपाययोजना न केल्याने शेतीचे नुकसान झाले. त्‍यामुळे सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

सीआरझेड अधिकारिणीने नियम कडक केल्याने जेसीबीसुद्धा वापरणे कठीण झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तलाठी व जिल्हाधिकारी कचेरीतील अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांनी संपर्क साधला. पण त्यांना सीआरझेड अधिकारिणीशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला, असे त्या शेतकऱ्यांनी सांगितले.

भाताच्‍या पिकाची झाली नासाडी

एका शेतकऱ्याने सांगितले की, समुद्राचे खारे पाणी शेतात आल्याने आपल्याला २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या पाण्यामुळे भाताच्या पिकाची नासाडी झाली. दरम्‍यान, अँथनी फाल्कांव व सांतान फर्नांडिस यांनी या समस्‍येकडे सरकारने लक्ष देण्‍याची मागणी केली आहे. तसेच आमदार व्‍हेंझी व्‍हिएगस यांचे आभार मानले.

सांतान फर्नांडिस, शेतकरी (थोंडावाडो-बेताळभाटी)

गेले आठ दिवसांपासून खारे पाणी शेतात येत होते. आम्‍ही संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आणून दिली होती. पण उपयोग झाला नाही. गेल्या वर्षीही अशीच स्थिती उद्‌भवली होती. पण जेसीबीचा वापर करून तेव्हा पाणी दुसरीकडे वळविण्यात आले होते. यंदा सरकारने अजून काहीच उपाययोजना न केल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT