Mopa International Airport | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Mopa International Airport: 'मोपा’ची व्याप्ती वाढली; नवी सहा शहरे जोडली!

भुवनेश्वर, रांची, राजकोट, वाराणसी, विशाखापट्टणम, आणि कोईंबतूर ही शहरे गोव्याशी जोडली जात आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa International Airport: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाची व्याप्ती वाढवत ‘इंडिगो’ विमान कंपनीने या महिनाअखेर 26 मार्चपासून आणखी सहा नव्या शहरांमध्‍ये विमान वाहतूक सुरू करत असल्याचे जाहीर केले आहे.

भुवनेश्वर, रांची, राजकोट, वाराणसी, विशाखापट्टणम, आणि कोईंबतूर ही शहरे गोव्याशी जोडली जात आहेत.

मोपा-भुनेश्वर, मोपा-रांची 26 व 29 मार्च, मोपा-राजकोट, मोपा-वाराणसी आणि मोपा विशाखापट्टणम 28 मार्च तर मोपा-कोईंबतूर ही सेवा 26 आणि 29 मार्चला सुरू असेल. ही शहरे सरळ विमानसेवेने जोडली जाणार असल्याने त्‍याचा फायदा प्रामुख्याने पर्यटनाला होणार आहे.

आंतरराष्ट्रीय सेवा कधी? :

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मार्चअखेर आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र यासंबंधी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्‍या साधनसुविधा अद्यापही सुरू झालेल्या नाहीत.

त्यामुळे या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवा कधी सुरू होणार याबाबत अद्यापही स्पष्टता नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjim Accident: भाड्याची 'थार' ठरली काळ...! मोरजी अपघातात महिलेचा मृत्यू, दोघे जखमी; हरियाणाचा चालक घटनास्थळावरुन फरार

VIDEO: "हिम्मत असेल तर रिंगमध्ये ये", जुन्या वादाला पुन्हा फोडणी! हरभजन सिंहला श्रीसंतचे थेट बॉक्सिंग चॅलेंज

Goa Congress: काँग्रेसची 22 सप्टेंबरपासून गोवा राखण यात्रा; युरी आलेमाव यांची घोषणा, पेडण्यापासून काणकोणपर्यंत आयोजन

Chhattisgarh Woman Assault: आधी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, मग हात पाय बांधून जबरदस्तीनं मुंडण, अन्...; चार मुलांसमोर नराधम बापाची आईवर क्रूरता

New York Times Square Firing: न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये पुन्हा गोळीबार; NBA चॅम्पियनशिपच्या जल्लोषादरम्यान गोंधळ, संशयित ताब्यात VIDEO

SCROLL FOR NEXT