SCO Conference Dainik Gomantak
गोवा

SCO Conference: बाणावलीत आजपासून ‘एससीओ’ परिषद

भारत-पाकिस्तान चर्चेला प्राधान्य : चीन, रशियाचे परराष्ट्रमंत्री शिष्टमंडळासह दाखल

गोमन्तक डिजिटल टीम

SCO Conference in Goa बाणावली येथे उद्या, गुरुवारपासून शांघाय सहकार्य संघटनेची परिषद सुरू होणार आहे. या परिषदेत चीन, पाकिस्तान, रशियासह इतर सदस्य देशांचे परराष्ट्रमंत्री 4 आणि 5 मे रोजी गोव्यातील बैठकीला उपस्थित राहतील.

शांघाय को-ऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन ही युरेशियन राजकीय, आर्थिक, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात सक्रिय असलेली संस्था आहे. या परिषदेसाठी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय नेते राज्यात दाखल झाले आहेत.

युरेशियन द्वीपसमूहातील देशांमधील परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा आणि समन्वयात्मक सामंजस्य करार करण्याच्या उद्देशाने गेल्या सात वर्षांपासून ही संघटना सक्रिय आहे.

या बैठकीतील चर्चा आंतरराष्ट्रीय विषय बनतात. प्रामुख्याने भारत-पाकिस्ता विषयातील घडामोडींकडे जगाचे लक्ष लागून राहिलेले असते. उद्यापासून दोन दिवस होणाऱ्या या परिषदेत विविध देशांमध्ये चर्चा, आंतरराष्ट्रीय संवाद आणि सामंजस्य करार होणार आहेत.

चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लावरोव हे या बैठकीसाठी आपल्या शिष्टमंडळासह राज्यात दाखल झाले आहेत. भारताचे परराष्ट्रमंत्री आणि परिषदेचे यजमान एस. जयशंकर राज्यात आले अाहेत.

बिलावलच्या हालचालींकडे लक्ष

बुधवारी संध्याकाळी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो हे आपल्या शिष्टमंडळासह राज्यात पोचले आहेत. या बैठकीच्या मुख्य अजेंड्याव्यतिरिक्त पाकिस्तानशी अन्य कोणत्याही मुद्यावर चर्चा होणार नाही, असे यापूर्वीच भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

मात्र, दोन्ही देशांमधील तणावाचे वातावरण आणि अन्य घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर या बैठकीकडे जगाचे लक्ष लागले आहे.

चीन, रशियाचे राष्ट्राध्यक्षही येणार

या बैठकीत प्रामुख्याने पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांशी होणाऱ्या चर्चेकडे सर्वांचे लक्ष असेल. येत्या जुलैमध्ये चीन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष देखील भारत भेटीवर येणार आहेत. या भेटीच्या पूर्वी आता होणारी बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Valpoi: भलेमोठे झाड पडले उन्मळून, 2 तास रस्ता बंद; वाळपई फोंडा मार्गावरील घटना

Goa Tribal Reservation: आता दिल्लीकडे साऱ्यांचे लक्ष, ST राजकीय आरक्षणाचा मुद्दा; प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा

Stray Dogs Goa: 'डॉग शेल्टर' होमसाठी सरकार कोर्टावर अवलंबून! मंत्री नीळकंठ हळर्णकर यांची माहिती

Waste Management: वाहनातून कचरा फेकताना आढळल्यास 10 हजार दंड, परवानाही रद्द होणार; CM सावंतांचा इशारा

Goa Live News: खंडणी प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी ४ जणांना केली अटक

SCROLL FOR NEXT