Hijab Row Dabolim Goa 
गोवा

इस्लामिक कार्यशाळेत शालेय मुलींना हिजाब घालण्यास भाग पाडले, हिंदू परिषद म्हणते ते दाबोळीतील 'स्कूल जिहाद' प्रकरण काय?

कार्यशाळेबाबत शिक्षण खात्याकडून कोणत्याही प्रकारची परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले नव्हते अशी माहिती आहे.

Pramod Yadav

Hijab Row Dabolim Goa: दाबोळी येथील एका उच्च माध्यमिक शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शालेय विद्यार्थ्यांना इस्लामिक कार्यशाळेला घेऊन जात तिथे मुलींना हिजाब घालण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी संबधित शाळेच्या प्राचार्यांना निलंबित करण्यात आले आहे.

शंकर गावकर असे उच्च माध्यमिक विद्यालयाच्या निलंबित केलेल्या प्राचार्यांचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामिक विद्यार्थी संघटनेच्या वतीने एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी दाबोळीतील एका शाळेच्या विद्यार्थ्यांना मशिदीत घेऊन जाण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे तिथे शालेय मुलींना हिजाब घालण्यास भाग पाडले. असा आरोप करण्यात येत आहे.

कार्यशाळेबाबत शिक्षण खात्याकडून कोणत्याही प्रकारची परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले नव्हते अशी माहिती आहे.

दरम्यान, याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेने आक्षेप घेतल्यानंतर शाळेच्या प्राचार्यांना निलंबित करण्यात आले आहे.

विश्व हिंदू परिषदेने या प्रकाराला स्कूल जिहाद अशी उपमा दिली आहे. तसेच, कार्यशाळा आयोजित केलेल्या विद्यार्थी संघटनेचा वादग्रस्त पीएफआय संघटनेशी संबध असल्याचा दावा देखील परिषदेने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaje Ghar: 'हे सरकारचे ऐतिहासिक पाऊल'! विश्‍वजीत राणेंचे प्रतिपादन; वाळपईत ‘माझे घर’ योजनेचे अर्ज वाटप

मनोज परबांपेक्षा आमचं गोव्यावर अधिक प्रेम, घाटी – घाटी करुनच त्यांचा आमदार निवडून आला; मेटींचा पलटवार

Bird week in India: 'चला, पक्षी वाचवूया, निसर्ग जपूया'! पक्षीशास्त्राचे जनक 'डॉ. सलिम अली' यांचे स्मरण

Serendipity Art Festival: देऊस नोस आकुडी, डबल बील; सेरेंडिपिटी कला महोत्सवातील विशेष नृत्य सादरीकरणे

Birsa Munda Jayanti: भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त 8000 दुचाकीस्‍वारांची शोभायात्रा! 15 नोव्हेंबरपर्यंत स्पर्धा, कार्यक्रमांची मेजवानी

SCROLL FOR NEXT