'गोव्यातील जनतेला आरोग्य, सुख, समृद्धी दे', मुख्यमंत्री सावंतांनी उज्जैनमध्ये घेतले बाबा महाकालचे दर्शन

मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी श्री महाकालेश्वर मंदिरात असलेल्या इतर मंदिरांना भेट दिली.
Goa CM Pramod Sawant offers prayers at Mahakal temple in Ujjain, Madhya Pradesh
Goa CM Pramod Sawant offers prayers at Mahakal temple in Ujjain, Madhya Pradesh
Published on
Updated on

Goa CM Pramod Sawant offers prayers at Mahakal temple in Ujjain, Madhya Pradesh: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी उज्जैनमध्ये बाबा महाकालचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री सावंत यांनी भस्म आरतीमध्ये सहभागी होत गोमन्तकीयांच्या आरोग्यासाठी आणि गोव्याच्या विकासासाठी भगवान महाकाल यांच्याकडे प्रार्थना केली.

यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत मंत्री विश्वजीत राणे, देविया राणे आणि दामोदर नायक उपस्थित होते. गोव्यातील जनतेचे आरोग्य निरोगी ठेव आणि राज्याच्या विकासासाठी त्यांनी बाबा महाकाल यांच्याकडे प्रार्थना केली आहे. देशाचा जसा विकास होत आहे तसाच गोवा राज्याचाही विकास व्हावा, अशी मी बाबा महाकाळाकडे प्रार्थना केली. असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

Goa CM Pramod Sawant offers prayers at Mahakal temple in Ujjain, Madhya Pradesh
CM Pramod Sawant: दिल्ली दौऱ्यानंतर आता मुख्यमंत्र्यांचं मध्यप्रदेशकडे प्रयाण, दौऱ्यामागे आहे 'हे' महत्वाचं कारण

महाकाल मंदिराचे पुजारी पंडित ओम गुरू यांनी याबाबत माहिती दिली. आज भाद्रपदाच्या दुसऱ्या सोमवारी सकाळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी मंत्र्यांसह बाबा महाकाल यांच्या भस्म आरतीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यांनी नंदी हॉलमधून बाबा महाकाळाचे दर्शन घेतले.

भस्म आरतीच्या वेळी मुख्यमंत्री बाबा महाकालच्या भक्तीत तल्लीन झालेले बाबा महाकालच्या जयघोषात टाळ्या वाजवताना दिसले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मंत्र्यांनी बाबा महाकालाचे दर्शन घेतल्यानंतर श्री महाकालेश्वर व्यवस्थापन समितीने त्यांचे स्वागत केले. यानंतर मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी श्री महाकालेश्वर मंदिरात असलेल्या इतर मंदिरांना भेटी दिल्या.

Goa CM Pramod Sawant offers prayers at Mahakal temple in Ujjain, Madhya Pradesh
इस्लामिक कार्यशाळेत शालेय मुलींना हिजाब घालण्यास भाग पाडले, हिंदू परिषद म्हणते ते दाबोळीतील 'स्कूल जिहाद' प्रकरण काय?

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत भाजपच्या निवडणूक प्रचारासाठी ते उज्जैन आले असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य सिंधिया हे सोमवारी वेगवेगळ्या ठिकाणी भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत सहभागी होणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांशिवाय पक्षाचे वरिष्ठ अधिकारीही पाच यात्रांना संबोधित करण्यासाठी मध्य प्रदेशात पोहोचत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com